माजी क्रिकेटपटू अजहरुद्दीनची हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड 

वृत्तसंस्था
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

 भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महंमद अजहरुद्दीन याची हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत त्याने एकतर्फी विजय मिळवून अध्यक्षपदाची लढत जिंकली. 

हैदराबाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महंमद अजहरुद्दीन याची हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत त्याने एकतर्फी विजय मिळवून अध्यक्षपदाची लढत जिंकली. 

क्रिकेटच्या मैदानावरील यशस्वी कारकीर्द मॅचफिक्‍सिंगने संपुष्टात आणल्यावर अजहरुद्दीनने आता क्रिकेट प्रशासक म्हणून दुसऱ्या खेळीला सुरवात केली आहे. 

विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी मॅच फिक्‍सिंग प्रकरणातून आजीवन बंदी उठल्याचे पुरावे सादर करू न शकल्यामुळे निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी त्यांची उमेदवारी रद्द ठरवली होती. या वेळी मात्र त्याने बाजी मारली. अजरुद्दीनने 31 डिसेंबर 1984 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि पदार्पणातच पहिल्या तीन कसोटीत शतक झळकाविण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर 99 कसोटी सामन्यात त्याने 6, 215, तर 334 एकदिवसीय सामन्यात 9,378 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 47, तर 174 एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्वदेखील केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohammad Azaruddin elected as chief of Hyderabad Cricket Association