VIDEO: मोहमद शामीची 'चिल्ड्रन' स्कूटरवर स्टंटबाजी | Mohammed Shami Children Scooter Stunt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammed Shami Children Scooter Stunt Gone Viral

VIDEO: मोहमद शमीची 'चिल्ड्रन' स्कूटरवर स्टंटबाजी

भारतीय संघाचा महत्वाचा गोलंदाज मोहमद शामीने (Mohammed Shami) इस्टाग्रामवर शेअर केलेली रिल्स सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय संघाचा महत्वाचा गोलंदाज म्हणून मोहम्मद शामीला ओळखले जाते. चांगल्या चांगल्या फलंदाजांना घरचा रस्ता दाखवणारा अशी या खेळाडूची ओळख आहे. शामीच्या खेळाची जेवढी चर्चा असते तेवढीच सोशल मिडियावरही चर्चा आसते. शामी नेहमी सोशल मिडियावर (Social Media) अ‍ॅक्टिव्ह असतो. इंस्टाग्रामवर शेअर केलेले रिल्सचे व्हिडिओही चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडतात.

शामीने काही दिवसापूर्वी शेअर केलेल्या रिल्सची (Instagram Reels) सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या रिल्स मध्ये शामी स्टंटबजी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शामी लहान चिल्ड्रन स्कूटरवर (Children Scooter) स्टंटबाजी करताना दिसत आहे. शामीचा हा तुफानी स्टंटची रिल्स मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. शामीच्या चाहत्यांनाही शमीचा हा हटके अंदाज मोठ्या प्रमाणात आवडला आहे.

मोहम्मद शामीने भारतीय संघात येण्यासाठी खूप कठिण काळाचा सामना केला आहे. मात्र मोहम्मद शमीने आपल्या फिटनेसवर मेहनत घेतली आणि भारतीय संघातील आपले स्थान पक्के केले. सध्या कसोटी आणि वनडे संघाचा अविभाज्य घटक झालेला मोहम्मद शामी टी 20 संघात देखील स्थान मिळवण्यासाठी इत्सुक आहे.