शमीने उलगडले भारतीय गोलंदाजीच्या यशाचे रहस्य

गेल्या काही दिवसांत भारतीय गोलंदाजीत झालेला चमत्कारिक बदलामागच्या कारणाचा खुलासा मोहम्मद शमीने केला आहे.
 mohammed shami
mohammed shamiFile Photo

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज (Team India's fast bowlers,) मोहम्मद शमीने (Mohammed Shami) टीम इंडियाच्या बॉलिंगसंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघाची गोलंदाजी अधिक मजबूत असून प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणण्याची क्षमता गोलंदाजांमध्ये आहे, असे मोहम्मद शमीने म्हटले आहे. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी शमीने गोलंदाजीच्या क्षमतेवर भाष्य केले. भारतीय गोलंदाजीतील व्हरायटीमुळे प्रतिस्पर्धी टीमला कोणत्या प्रकारची खेळपट्टी करायची? यासंदर्भात गोंधळ उडतो, असेही तो म्हणाला.

क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीमध्ये शमीने भारतीय गोलंदाजीतील क्षमतेवर भाष्य केले. गेल्या काही दिवसांत भारतीय गोलंदाजीत झालेला चमत्कारिक बदलामागच्या कारणाचा खुलासा मोहम्मद शमीने केला आहे. संघातील खेळीमेळीच्या वातावरणामुळे भारतीय गोलंदाजी बहरल्याचे शमीने म्हटले आहे. प्रत्येकजण खेळाचा आनंद घेत असून त्यामुळेच आम्हाला यश मिळत आहे. फास्ट बॉलिंग युनिटमधील प्रत्येकजण कठोर मेहनत घेतोय असेही तो म्हणाला.

 mohammed shami
IPL स्पर्धेत संघ तळाला, पण माणुसकीत टॉपला!

यापूर्वी प्रतिस्पर्धी संघ आमच्या बॅटिंग लाइनअपला घाबरत होता. आता गोलंदाजीचाही ते धसका घेतात. आमच्या बॉलिंग युनिटमध्ये खास गोष्ट आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ खेळपट्टी बनवण्यात गोंधळून जातात. खेळपट्टी स्पिनरला मदत करणारी असेल तर भारतीय गोलंदाजांची जादू दिसणार हे त्यांना माहित असते. हा विचार करुन जेव्हा ते सीमिंग ट्रॅक तयार करतात त्यावेळी देखील त्यांना दिलासा मिळत नाही, असा विश्वास शमीने भारतीय गोलंदाजीबद्दल व्यक्त केलाय.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिप फायनल (ICC World Test Championship) आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच निवड झाली. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाची प्रमुख मदारही मोहम्मद शमीच्या खांद्यावर असणार आहे. 90 च्या दशकात भारतीय संघात जलदगती गोलंदाजांची उणीव होती. ही परिस्थिती बदलली आहे, असेच मोहम्मद शमीला म्हणायचे आहे. त्याकाळात परदेशात भारतीय गोलंदाजांचे खांदे पडल्याचे चित्र पहायला मिळायचे. पण आता ही परिस्थिती बदलली आहे. शमी, ईशांत शर्मा, बुमराह आणि उमेश यादव यासारख्या गोलंदाजांमुळे भारतीय गोलंदाजीतील ताकद वाढली आहे. भारतीय संघाच्या विजयात जलदगती गोलंदाज लक्षवेधी कामगिरीही बजावत आहेत.

 mohammed shami
WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, असा आहे संघ

भारतीय संघ 18 जून रोजी न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलसाठी भिडणार आहे. इंग्लंडच्या मैदानात भारतीय गोलंदाज कमाल करुन पहिली वहिली टेस्ट चॅम्पियनशिपवर नाव कोरतील, असा विश्वास मोहम्मद शमीने व्यक्त केला आहे. त्याचा हा विश्वास किवींचा जीव घेणारा ठरणार का? हे येणारा काळच ठरवेल. याशिवाय भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे. परदेशी खेळपट्टीवर भारतीय जलदगती गोलंदाज कसोटीस पात्र ठरणार का? हे निश्चितच पाहण्याजोगे असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com