मोहम्मद सिराजचा ICC Ranking मध्ये धुमाकूळ; सर्वांना मागे टाकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammed Siraj ICC ODI Bowlers Ranking

मोहम्मद सिराजचा ICC Ranking मध्ये धुमाकूळ; सर्वांना मागे टाकले

Mohammed Siraj ICC ODI Bowlers Ranking : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज जबरदस्त फॉर्मात आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली. त्याचा फायदा त्याला गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीत झाला. तो जगातील अव्वल गोलंदाज बनला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतला. गेल्या 1 वर्षात त्याने चमकदार कामगिरी करत अव्वल स्थान गाठले आहे.(Mohammed Siraj becomes world number one bowler in ODIs)

हेही वाचा: Mohammad Azharuddin : आमचं एकमतानं ठरायचं... पाकच्या माजी क्रिकेटपटूचा अझहरूद्दीनबाबत मोठा खुलासा

फेब्रुवारी 2022 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर मोहम्मद सिराजने टीम इंडियासाठी 20 सामन्यांमध्ये 37 विकेट घेतल्या. याआधी मंगळवारी त्याला आयसीसी वनडे टीम ऑफ द इयरमध्ये स्थान मिळाले. न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांना मागे टाकत तो मंगळवारी नंबर-1 वर पोहोचला आहे.

हेही वाचा: IND vs NZ: धडाकेबाज खेळीनंतर रोहित पत्रकारांवर संतापला; काय आहे कारण?

मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 9 विकेट घेतल्या. यानंतर न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 4 विकेट घेतल्या. दुसऱ्यामध्ये त्याने आर्थिकदृष्ट्या गोलंदाजी केली, परंतु त्याने फक्त 1 बळी घेतला. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने 5 विकेट घेतल्या होत्या.

एकदिवसीय क्रमवारीत मोहम्मद सिराजचे 729 रेटिंग गुण आहेत. जोश हेझलवूड 727 रेटिंग गुणांसह दुसऱ्या तर ट्रेंट बोल्ट 707 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सिराजशिवाय कोणताही भारतीय गोलंदाज टॉप 10 मध्ये नाही. कुलदीप यादव 20व्या क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराह 24 व्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमी 32 व्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :Mohammed Sirajind vs nz