आठ आठवड्यांत सहा विन-डे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबई - दोन महिन्यांतील आठ आठवड्यांत सहा रविवारी धावत मोनिका आथरे हिने सात लाखांहून जास्त बक्षिसांची कमाई केली. पूर्ण मॅरेथॉनचे उद्दिष्ट असल्यामुळे तिला हे धावता आले; पण आता मी यंदापुरती थांबणार आहे. दिल्लीतील फेब्रुवारीच्या अखेरीस होणाऱ्या स्पर्धेद्वारे जागतिक पात्रता साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे मोनिकाने सांगितले. 

मुंबई - दोन महिन्यांतील आठ आठवड्यांत सहा रविवारी धावत मोनिका आथरे हिने सात लाखांहून जास्त बक्षिसांची कमाई केली. पूर्ण मॅरेथॉनचे उद्दिष्ट असल्यामुळे तिला हे धावता आले; पण आता मी यंदापुरती थांबणार आहे. दिल्लीतील फेब्रुवारीच्या अखेरीस होणाऱ्या स्पर्धेद्वारे जागतिक पात्रता साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे मोनिकाने सांगितले. 

भारतातील मॅरेथॉन मोसम फार तर चार महिन्यांचा. त्यात प्रत्येक रविवारी स्पर्धा होत असते. लांब पल्ल्याचे धावपटू या कालावधीत सात ते आठ लाखांपर्यंत कमाई करण्याचा प्रयत्न करतात, मोनिका नेमके हेच करीत होती. 20 नोव्हेंबरला झालेल्या दिल्ली मॅरेथॉनपासून मोनिका धावत आहे. तिने आपण यंदा दिल्ली, कोलकता, भोपाळ, वसई-विरार, हैदराबाद या पाच स्पर्धा जिंकल्या. मार्गदर्शकांनी या वेळी जास्त प्रयत्न करू नको, असे सांगितले होते, तरीही जिंकणार याची खात्री होती. तिने अन्य प्रतिस्पर्धींना किमान दीड मिनिटांच्या अंतराने मागे टाकत बाजी मारली. 

मॅरेथॉन स्पर्धेचा अनुभव असलेल्या सुनीता गोधारा यांनी दोन अर्धमॅरेथॉनमध्ये किमान पंधरा दिवसांचे अंतर असावे, ज्याचा फायदा रिकव्हरीसाठी होतो, मात्र त्याचवेळी जर आपण पूर्ण मॅरेथॉनचा सराव करीत असू, तर एवढ्या स्पर्धा धावणे शक्‍य होते, असे तिने सांगितले. मोनिकाला अर्धमॅरेथॉनऐवजी पूर्ण मॅरेथॉनचेच वेध लागले आहेत. 

मॅरेथॉन धावल्यावर काय होते, ते मी ललिता बाबर, कविता राऊत यांच्याकडे पाहून अनुभवले आहे. ते पाहून मला भीतीच वाटत असे; पण तरीही मी पूर्ण मॅरेथॉन करणार आहे. डॉक्‍टरांबरोबर याबाबत चर्चा करीत आहे. एवढे धावायचे तर त्यासाठी शरीर तयार करावे लागते, त्याचा खर्च करावाच लागतो. घरच्याही जबाबदाऱ्या प्रत्येकास असतात. सात-आठ लाखांची रक्कम या सर्वच गरजा पूर्ण करीत नाहीत, असे तिने सांगितले. 

महिलांच्या या अर्धमॅरेथॉन शर्यतीत कोल्हापूरची नवोदित धावपटू मीनाक्षी पाटील आणि लखनौची अनुराधा सिंग यांनी तिसरा क्रमांक मिळविला. कोल्हापूर पोलिसांत असलेल्या मीनाक्षीने पाच मिनिटांनी बाजी मारली. गुजरातची सीताबेन चारे चौथी आली खरी, पण उकाड्यात टिकाव धरू शकली, त्यास बक्षिसाची जोड मिळाल्याचे तिला समाधान होते. 

Web Title: monika athare win