INDvsWI : भारताचा मारा थोपविण्यासाठी विंडीजने नेमला नवा बॅटींग कोच 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 डिसेंबर 2019

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सहा डिसेंबरपासून ट्वेंटी20 मालिकेला सुरवात होत आहे. या मालिकेसाठी भारतीय गोलंदाजांचा भेदक आणि अचूक मारा थोपविण्यासाठी विंडीजने नवीन फलंदाजी प्रशिक्षक नेमला आहे. 

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सहा डिसेंबरपासून ट्वेंटी20 मालिकेला सुरवात होत आहे. या मालिकेसाठी भारतीय गोलंदाजांचा भेदक आणि अचूक मारा थोपविण्यासाठी विंडीजने नवीन फलंदाजी प्रशिक्षक नेमला आहे. 

Video : मनिष पांडेच्या लग्नातला युवीचा भन्नाट डान्स एकदा पाहाच

मॉंटी देसाई यांना विंडीजने फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून नेमले आहे. विंडीज क्रिकेट मंडळानं त्यांच्यासोबत दोन वर्षांचा करार केला आहे. देसाई यांनी यापूर्वी अफगाणिस्ताननेपाळ, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लायन्स या संघाना फलंदाजीचे प्रशिक्षण दिले आहे. 

त्यांनी नुकतेच संयुक्त अरब अमिराती आणि कॅनडा या दोन्ही संघांच्या फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monty Desai Appointed As West Indies Batting Coach