'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनी हाच सर्वोत्तम भारतीय कर्णधार!

टीम ई-सकाळ
Thursday, 13 February 2020

गेल्या वर्षी आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईला मुंबई इंंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. त्या मॅचनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी एकही मॅच खेळला नाहीय. तो क्रिकेटपासून दूर असल्यामुळे तो आता कधी निवृत्ती घेणार, याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. काहींना धोनीच्या निवृत्तीचे वेध लागलेत, तर काहीजण धोनी क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची वाट पाहत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, महेंद्रसिंह धोनी हाच सर्वोत्तम कॅप्टन असल्याचं मत टीम इंडियातील डावखुरा बॅट्समन सुरेश रैनाने व्यक्त केलं आहे. स्टार स्पोर्ट या वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने आपले मत नोंदविले.

Image may contain: 2 people, people standing

धोनीच्या कॅप्टनशिपमध्ये टीम इंडियाने २००७ चा टी-२० वर्ल्डकप आणि २०११ चा वनडे वर्ल्डकप जिंकला होता, या टीमचा रैनाही एक अविभाज्य घटक होता. तसेच आयपीएलमध्येही रैना धोनी कॅप्टन असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज या टीममधून खेळत आहे. 

- Womens T20I Tri-series : स्मृतीची अर्धशतकी खेळी व्यर्थ; ऑस्ट्रेलियाने जिंकली सीरिज!

स्टार स्पोर्ट्सच्या सुपर किंग्ज शोमध्ये बोलताना रैना म्हणाला की, 'धोनीने टीम इंडियात खूप चांगले बदल केले. तसेच तो ड्रेसिंग रूममध्येही हलकंफुलकं वातावरण ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. यंदा चेन्नईच्या टीममध्येही अनेक अनुभवी आणि तरूण खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे निश्चितच टीम चांगली कामगिरी करेल,' अशी अपेक्षा रैनाने बोलून दाखवली. 

Image may contain: 2 people, people sitting and beard

- राहुल, तू 12व्या क्रमांकावरही शतक करू शकतोस!​

दरम्यान, चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियममधील तीन स्टँड खुली करण्यात आल्याने फॅन्सची संख्याही वाढेल. त्यामुळे सीएसकेच्या फॅन्सनी मोठ्या संख्येत मॅच पाहायला या आणि आपल्या लाडक्या टीमला चिअर्स करा. त्यामुळे आम्हालाही मॅच जिंकण्यासाठी एनर्जी मिळेल,' अशी विनंतीही रैनाने यावेळी केली. 

Image may contain: 1 person, outdoor

- 'जर तू बॉलिंग करशील तर..'; इंग्लंडची डॅनियल चहलला काय म्हणाली पाहा

गेल्या वर्षी आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईला मुंबई इंंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा विजेतेपद जिंकण्याचा इराद्यानेच सीएसके मैदानात उतरेल. 

 Image may contain: 4 people, outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni is best captain India ever had says Suresh Raina