World Cup 2019 : धोनी आता होणार सियाचीन सीमेवर तैनात?

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जुलै 2019

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अशातच त्याच्या खास मित्रांने धोनी निवृत्तीनंतर लष्करात जाण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे. 

वर्ल्ड कप 2019 : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अशातच त्याच्या खास मित्रांने धोनी निवृत्तीनंतर लष्करात जाण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे. 

धोनीला निवृत्ती नंतर देशाची सेवा करण्याची इच्छा आहे म्हणूनच तो लष्करात दाखल होण्याची शक्यता आहे. याहीपुढे जाऊन तो सियाचीनच्या सीमेवर तैनात होणार असल्याचेही सांगितले जात आहे. 

धोनी आणि त्याचे राष्ट्रप्रेम सर्वश्रूत आहे. त्याने स्वत: अनेकवेळा लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ''क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर मला लष्टकरात भरती व्हायची इच्छा आहे.'' असे त्याने म्हटले आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni to join Armed forces of India