MS Dhoni ICC World Cup Final : धोनी खूप निराश झाला... भारत - ऑस्ट्रेलिया फायनल अर्ध्यातच सोडली? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni ICC World Cup final

MS Dhoni ICC World Cup Final : धोनी खूप निराश झाला... भारत - ऑस्ट्रेलिया फायनल अर्ध्यातच सोडली?

MS Dhoni ICC World Cup final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकप फायनलदरम्यान 2011 च्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी कुठं होता अशी चर्चा होती. तर धोनी हा त्याची पत्नी साक्षीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्तराखंड मधील नैनिताल येथे गेला होता. जरी तो कुटुंबासोबत वेळ घालवत असला तरी त्याचे लक्ष भारत ऑस्ट्रेलिया फायनलवर होता.

शनिवारी रात्री धोनीने साक्षीचा वाढदिवस साजरा केला. त्याने केक कटिंगचा कार्यक्रम देखील केला. त्यावेळी धोनी परिवारात उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण होते. मात्र रविवारी सर्व वातावरण बदललं. सर्वांच लक्ष वर्ल्डकप फायनलवर होतं.

महेंद्रसिंह धोनीला अहमदाबादमध्ये जाऊन सामना पाहता आला नाही मात्र तो हा सामना टीव्हीवर पाहत होता. एरवी शांत राहणारा धोनीला आपली निराशा लपवता आली नाही. दैनिक जागरणनने दिलेल्या वृत्तानुसार भारत धावा करताना संघर्ष करत होता. हे पाहून धोनी निराश झाला अन् तो टीव्हीपासून दूर गेला.

धोनीने यापूर्वी भारत जिंकण्याबाबत आशावाद दर्शवला होता. मात्र भारताच्या कामगिरीमुळे धोनी थोडा निराश झाला.

धोनी उत्तराखंडच्या भेटीवर

महेंद्रसिंह धोनी पत्नी साक्षी धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नैनिताल येथ गेला होता. त्याने आपला पूर्ण दिवस कुटुंब आणि मित्रांसाठी दिला होता. त्याच्याबरोबर मुलगी झिवा देखील होती. धोनीला नैनितालचे नयनरंम्य दृष्य आवडली. धोनी कुटुंबासोबतच त्यांच्या मैत्रिणी भाव्या दिवान, इशा जैन दिवान देखील होत्या. त्यांनी साक्षीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन इन्स्टाग्रामवरून शेअर केलं.

धोनी कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी गेला होता. मात्र फायनलमधील भारताची स्थिती पाहून तो नाराज झाला अन् त्याने सामना पाहणं अर्ध्यातच सोडून दिलं.

(Sports Latest News)

टॅग्स :MS DhoniCricket World Cup