सचिनलाही धोनी नको आहे संघात

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जुलै 2019

- भारतीय क्रिकेट निवड समिती महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीकडे डोळे लावून बसलेला असतानाच सचिन तेंडुलकरने विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर निवडलेल्या सयुक्तिक संघातही धोनीला स्थान मिळवता आलेले नाही. 
- विश्‍वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर सचिनने आपला स्वतंत्र संयुक्त संघ निवडला आहे. न्यूझीलंडच्या केन विल्यमसनकडेच संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट निवड समिती महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीकडे डोळे लावून बसलेला असतानाच सचिन तेंडुलकरने विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर निवडलेल्या सयुक्तिक संघातही धोनीला स्थान मिळवता आलेले नाही. 
विश्‍वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर सचिनने आपला स्वतंत्र संयुक्त संघ निवडला आहे. न्यूझीलंडच्या केन विल्यमसनकडेच संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे

 या संघात पाच भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला असला तरी, धोनीला स्थान मिळालेले नाही. संघात निवडलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा यांचा समावेश करण्यात आला आहे. 

सचिनने सलामीच्या जोडीसाठी रोहितच्या साथीला इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टॉची निवड केली आहे. त्यानंतर विल्यमसन, कोहली, शकिब, स्टोक्‍स, पंड्या आणि जडेजा अशी क्रमवारी त्याने ठेवली आहे. मिशेल स्टार्क, जोफ्रा आर्चर आणि बुमरा या तीन वेगवान गोलंदाजांना त्याने प्राधान्य दिले आहे. यष्टिरक्षक म्हणून त्याने बेअरस्टॉ यालाच पसंती दिली आहे. 

यापूर्वी, आयसीसीने जाहीर केलेल्या विश्‍वकरंडक संघात रोहित आणि बुमरा या दोनच भारतीय खेळाडूंना पसंती मिळाली होती. 
सचिनने निवडलेला संघ ः रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टॉ, केन विल्यमसन (कर्णधार), विराट कोहली, शकिब अल हसन, बेन स्टोक्‍स, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मिशेल स्टार्क, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमरा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni not included in Sachin Tendulkar best XI