काश्मिरसाठी लष्करी वर्दीतील माहीचा फ्री ऍकॅडीमचा वादा

MS Dhoni to open his cricket academy in Jammu & Kashmir
MS Dhoni to open his cricket academy in Jammu & Kashmir

नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनीने काश्‍मीरमधील तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी मोफत क्रिकेट ऍकॅडमी काढण्याची घोषणा केली आहे. काश्‍मीर खोऱ्यातील वातावरण निवळताच तो यासाठी 'स्टान्स' घेणार आहे.

क्रीडा मंत्रालयाशी संपर्क साधून तो औपचारिकरीत्या माहिती देणार आहे. काश्‍मिरी युवकांमधील क्रिकेट गुणवत्तेला पाठिंबा देण्याची त्याची तळमळ आहे. मानद लेफ्टनंट कर्नल असलेला धोनी सध्या 106 टीए पॅरा बटालीयनमध्ये दाखल झाला असून तो काश्‍मीरमध्ये तैनात आहे. 15 ऑगस्ट रोजी तो लेहमध्ये तिरंगा फडकाविण्याची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com