INDvsSA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनीला वगळण्याचं हे आहे खरं कारण!

वृत्तसंस्था
Friday, 30 August 2019

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेसाठी धोनीने स्वत:हून माघार घेतली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या तीन ट्वेंटी20 सामन्यांसाठी तो उपलब्ध नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. "हो, धोनीने तो उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने संघनिवडीत त्याचा विचार करण्यात आलेला नाही,'' असे म्हणत प्रसाद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. 

नवी दिल्ली : पुढील महिन्यात मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन ट्‌वेन्टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून बहुचर्चित महेंद्रसिंह धोनीला स्थान देण्यात आले नाही. धोनीला संघात स्थान देण्यात न आल्याने निवड समितीने त्याला अप्रत्यक्षपणे संदेश दिल्याची चर्चा सुरु आहे मात्र, त्याला संघात न घेण्याचं खरं कारण निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेसाठी धोनीने स्वत:हून माघार घेतली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या तीन ट्वेंटी20 सामन्यांसाठी तो उपलब्ध नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. "हो, धोनीने तो उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने संघनिवडीत त्याचा विचार करण्यात आलेला नाही,'' असे म्हणत प्रसाद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. 

भारतीय संघ आता पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी20 विश्वकरंडकासाठी संघबांधणीला सुरवात करत आहे. त्यामुळे आता सर्व खेळाडूंना सातत्याने संधी देण्यास सुरवात केली जाईल. धोनीला आता ट्वेंटी20 संघात स्थान मिळणे जवळपास अशक्य असल्याने त्याच्याजागी रिषभ पंतसह संजू सॅमसन, ईशान किशन यांना संधी देण्यात येईल.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSK Prasad Reveals Reasons Behind MS Dhonis Absence For South Africa T20Is