शालेय क्रीडा संघटनेची स्टॅनिस्लासला नोटीस

मुंबईच्या शालेय हॉकी लढतीतील चुरस
मुंबईच्या शालेय हॉकी लढतीतील चुरस

मुंबई : मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या हॉकी स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या वेळी गैरवर्तन केलेल्या वांद्रेच्या सेंट स्टॅनिस्लास शाळेला नोटीस बजावली आहे, त्याच वेळी त्यांच्या मार्गदर्शकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

सोळा वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात माटुंगाच्या डॉन बॉस्कोने वांद्रेच्या सेंट स्टॅनिस्लासला 3-0 असे हरवले. या सामन्यात स्टॅनिस्लासच्या एका खेळाडूने प्रतिस्पर्धी संघातील स्टीक ब्रेकच्या वेळी फेकून दिली. त्याबद्दल पंचांनी संबंधित खेळाडूस कार्ड दाखवले. त्यावरून वाद सुरू झाला. त्यात स्टॅनिस्लासचे मार्गदर्शक तांत्रिक पदाधिकाऱ्यांकडे जाऊन वाद करू लागले. याबाबतचा अहवाल मुंबई शालेय क्रीडा संघटनेकडे आला होता.

खेळाडूवर सामन्याच्या वेळीच कारवाई झाली होती. त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ नये यासाठी आम्ही त्याला 25 तारखेला बोलावले आहे. त्यावेळी त्याला कठोर समज देण्यात येईल, असे मुंबई शालेय क्रीडा संघटनेचे हॉकी सचिव लॉरेन्स बिंग यांनी सांगितले. त्याच वेळी त्यांनी मार्गदर्शक जॉर्ज यांच्यावर कठोर कारवाई करणार आहोत; तसेच शाळेला नोटीस पाठवली असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com