FlashBack 2019 : क्रिकेटमध्ये दांडी; इतर खेळांमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी!

मुकुंद पोतदार
शनिवार, 28 डिसेंबर 2019

क्रिकेटप्रेमींची निराशा झाली तरी, भारतीय महिलांनी चमकदार कामगिरीने वर्ष गाजवले. कुस्ती, बॅडमिंटन, हॉकीतील विक्रम कौतुकाचे विषय ठरले.
 

फ्लॅशबॅक 2019 : वर्ल्डकप क्रिकेटचे आणि टोकियो ऑलिंपिकच्या आधीचे वर्ष म्हणून २०१९ कडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष होते. सर्वाधिक चर्चेचा विषय अर्थातच क्रिकेट होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या अपेक्षेने सहभागी झालेल्या टीम इंडियाने घोर अपेक्षाभंग केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपांत्य फेरीतील प्रवेश ही कामगिरी वरकरणी प्रभावी वाटेल, पण न्यूझीलंडविरुद्ध पावसाचा व्यत्यय आलेल्या आणि एक दिवस लांबलेल्या लढतीत भारतीय फलंदाज अपयशी ठरले. वर्ल्डकप गाजविलेल्या रोहित शर्माने नंतर कसोटीतही प्रभाव पाडला, पण दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, बांगलादेश अशा कमकुवत प्रतिस्पर्ध्यांविरुद्धच्या यशावर समाधान मानावे लागण्याची वेळ क्रिकेटप्रेमींवर आली.

इतर खेळांमध्ये ऐतिहासिक घडामोडी घडल्या. यंदा २५ ऑगस्ट ही तारीख भारतीय क्रीडा क्षेत्रात माईलस्टोन ठरली. त्या दिवशी स्वित्झर्लंडमधील बॅसल शहरात पी. व्ही. सिंधू हिने जागतिक स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यात तिने जपानच्या नोझोमी ओकुहारा हिला ३८ मिनिटांतच २१-७, २१-७ असे हरविले.

Image may contain: 1 person, smiling, standing

- 'धाकड गर्ल' गीता फोगटच्या घरी आलाय छोटा 'सांता'!

भारताचे पहिले जागतिक सुवर्णपदक तिने जिंकले. दोन वर्षांपूर्वी ग्लोसगोमध्ये ओकुहाराविरुद्धच तिला ११० मिनिटे चाललेल्या लढतीत पराभूत व्हावे लागले होते. सर्वोच्च पातळीवर अंतिम फेरीतील पराभवाचे दुष्टचक्र सिंधूने संपुष्टात आणले आणि तेसुद्धा अगदी धडाक्‍यात. दोन ब्राँझ, दोन रौप्य आणि एक सुवर्ण अशी एकूण पाच जागतिक पदके सिंधूने जिंकली आहेत याचा उल्लेख करावा लागेल.

आवारेला ब्राँझपदक

देशाला कुस्तीत पहिले ऑलिंपिक पदक जिंकून दिलेल्या खाशाबा जाधव यांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रासाठी राहुल आवारेने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने जागतिक स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले. अमेरिकेच्या टायलर ली ग्राफ याला त्याने ६१ किलो वजनी गटात ११-४ असे हरविले. आशियाई ब्राँझ, राष्ट्रकुल सुवर्ण आणि आता जागतिक ब्राँझ अशी यशाची चढती कमान त्याने राखली होती. 

Image may contain: 1 person, standing

कझाकिस्तानमधील नूर-सुलतानमधील स्पर्धेतील पदकाद्वारे राहुलने आपली क्षमता दाखवून दिली.

- लवकरच नवा निवड समिती अध्यक्ष आणणार; गांगुलींनी दिला शब्द

राहीची ऑलिंपिक पात्रता

यंदा राही सरनोबत आणि तेजस्विनी सावंत यांनी ऑलिंपिक पात्रता संपादन केली. राहीने जर्मनीतील म्युनिचमधील विश्‍वकरंडक स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धा विजेती असलेल्या राहीने नवोदित देशभगिनी मनू भाकर हिचे आव्हान परतावून लावले. राहीने लंडन ऑलिंपिकमध्येही भाग घेतला होता.

Image may contain: 1 person, sitting and sunglasses

तेजस्विनीने कतारमधील दोहा येथील आशियाई स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठत टोकियोचे तिकीट नक्की केले. जागतिक विजेतेपद जिंकले असले तरी तेजस्विनीकडून अपेक्षा होती ती ऑलिंपिकची. त्या दिशेने तिने कारकिर्दीत प्रथमच पाऊल टाकले.

- Breaking : 2020 मध्ये होणार 'रॅकेट' म्यान; 'वन लास्ट रोअर' म्हणत लिअँडरची निवृत्तीची घोषणा!

वयाच्या अडतिसाव्या वर्षी तिने ही कामगिरी केली याचा उल्लेख करावा लागेल. २०१९ मध्ये खेळाच्या आघाडीवर या महत्त्वाच्या घडामोडी होत्या. आता पुढील वर्षी टोकियो ऑलिंपिक आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्डकपची क्रीडाप्रेमींना प्रतीक्षा आहे.

मानसी पॅरामध्ये जगज्जेती

Image may contain: 1 person, smiling, standing

- पॅरा बॅडमिंटनमध्ये मानसी जोशी सिंधूच्या आधी एक दिवस जगज्जेती
- अंतिम फेरीत देशभगिनी पारुल परमारवर मात

- तीन वेळच्या विश्‍वविजेत्या पारुलवर दोन गेममध्ये मात

मेरी कोमचा ठसा

Image may contain: 1 person, smiling, standing

- महिला बॉक्‍सर मेरी कोम जागतिक स्पर्धेत आठ पदके जिंकणारी पहिलीच स्पर्धक.
    
- क्‍युबाचा पुरुष बॉक्‍सर फेलिक्‍स सॅव्हॉन याचा उच्चांक मोडला.
रशियातील उलन उदे येथील स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत तुर्कस्तानच्या बुसेनाझ कॅकीरोग्लूविरुद्ध हार. त्यामुळे ब्राँझ.

- मेरी सहा वेळची विश्‍वविजेती आणि एक रौप्यही.

Image may contain: 16 people, people smiling, people standing and outdoor

हॉकीत ऑलिंपिक पात्रता

- अधिकृत राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीत दोन्ही संघ ऑलिंपिकला पात्र.

- पुरुष संघाने रशियाला हरवून टोकियोची मोहीम फत्ते केली.

- महिला संघाकडूनही पात्रता साध्य.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukund Potdar write an article on how India performed in various sports in year 2019