मुंबई सिटी एफसीची रेफरींना मारहाण

मुंबई सिटी एफसीच्या खेळाडूंनी पंचांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे
मुंबई सिटी एफसीच्या खेळाडूंनी पंचांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे

मुंबई : कर्नाटक स्पोर्टिंगविरुद्धच्या मुंबई शहर फुटबॉल एलीट साखळीतील सामन्यात पंचांचे निर्णय न पटल्याने मुंबई सिटी एफसीने पंचांना मारहाण केली आहे. या संदर्भात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली. त्याच वेळी मुंबई फुटबॉल संघटनेने या संदर्भातील चौकशीसाठी मुंबई सिटी एफसी संघ, रेफरींना बोलावले आहे.

सामना संपल्यानंतर मुंबई सिटी एफसीचे पदाधिकारी आणि लाईन्समन यांच्यात बाचाबाची झाली. लाईमन्समने त्याच्याकडील ध्वज वरती केल्यावर प्रकरण चिघळल्याचे सांगितले जात आहे. त्यातून मुंबई सिटी एफसीच्या संघाने रेफरींना मारहाण केली. याबाबत वांद्रे पोलिसांकडे तक्रारही नोंदवण्यात आली आहे.
या घटनेच्या अहवालाची आम्हाला प्रतीक्षा आहे. अद्याप सर्व काही स्पष्ट झालेले नाही. पंच मंडळाची आज बैठक होत आहे. त्यांचाही अहवाल येईल. त्यानंतर आम्ही रविवारी याबाबत चौकशी करणार आहोत, असे मुंबई फुटबॉल संघटनेचे सचिव सुधाकर राणे यांनी सांगितले.

मॅंचेस्टर सिटीने खरेदी केल्यामुळे जास्त चर्चेत आलेल्या मुंबई सिटी एफसीचा दुय्यम संघ मुंबई जिल्हा फुटबॉलच्या एलीट साखळीत खेळतो. दरम्यान, या घटनेची मुंबई सिटी एफसी संघव्यवस्थापनाने दखल घेतली आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. त्यांच्या अहवालानुसार आम्ही निर्णय घेणार आहोत, असे मुंबई सिटी एफसीच्या सूत्रांनी सांगितले.

मुंबईतील फुटबॉल लढतींवर पंचांचा बहिष्कार
मैदानावरील पंचासाठी सुरक्षा अत्यावश्‍यक असल्याचे या प्रकरणाने स्पष्ट झाले आहे. सामना सुरळीत घेण्याची जबाबदारी रेफरींची असते. त्या वेळी त्यांना संरक्षण हवे, ही मागणी यापूर्वीही केली होती. आता पुन्हा याकडे लक्ष वेधणार आहोत, त्याचा निषेध करण्यासाठी आजच्या सामन्यांवर आम्ही बहिष्कार टाकला, असे मुंबई जिल्हा फुटबॉल रेफरी मंडळाचे प्रमुख वॉल्टर परेरा यांनी सांगितले. आजच आम्ही बहिष्कार टाकला होता. याबाबतची पुढील व्यूहरचना लवकरच ठरवण्यात येईल. सामन्यांसाठी मैदाने मिळत नसल्याने आम्ही एकाच दिवसाचा बहिष्कार टाकला. त्याचा फटका आठ सामन्यांना बसला, असे वरिष्ठ रेफरी तपन दास यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com