esakal | मुंबई इंडियन्सचा मुंबईतच सराव; पण नेमका कोठे? वाचा सविस्तर...

बोलून बातमी शोधा

mumbai indians for ipl

मुंबई इंडियन्स संघातील कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, धवल कुलकर्णी आणि आदित्य तरे हे मुंबईत राहात आहेत, तसेच कृणाल आणि हार्दिक पंड्या हे बडोद्यातील आहेत.

मुंबई इंडियन्सचा मुंबईतच सराव; पण नेमका कोठे? वाचा सविस्तर...
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : आयपीएल कधी आणि कोठे होणार याबाबत अद्याप अनिश्‍चितता असली तरी मुंबई इंडियन्स सराव सुरू करणारा पहिला संघ ठरणार आहे. घणसोली येथील रिलायन्स स्टेडियमवर गुरुवारपासून सरावास प्रारंभ होत आहे. 

सर्वात मोठी बातमी - चीनी हॅकर्सकडून 5 दिवसात 40 हजार सायबर हल्ले...

मुंबई इंडियन्स संघातील कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, धवल कुलकर्णी आणि आदित्य तरे हे मुंबईत राहात आहेत, तसेच कृणाल आणि हार्दिक पंड्या हे बडोद्यातील आहेत. आदित्य तरेचा अपवाद वगळता हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, त्यांना सराव करायचा असेल तर ते बीसीसीआयच्या परवानगीनंतर सराव करू शकतात, असे मुंबई इंडियन्सकडून स्पष्ट करण्यात आले. 

...कायद्याचे उल्लंघन झाल्यास जबाबदारी तुमची; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गुरुवारपासून आपण सराव करणार असल्याचे सूर्यकुमार यादवने एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले. सराव करण्याचा निर्णय फ्रॅंचाईसने खेळाडूंवर सोपवला आहे. बॅट पुन्हा हातात धरण्यासारखा दुसरा आनंद नाही, सराव करण्यासाठी आपण आतुर आहोत, असे सूर्यकुमारने सांगितले. लॉकडाऊनमुळे आपण घराबाहेर क्वचितच गेलो असल्याचे तो म्हणाला.

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

रोहित शर्मा, हार्दिक पंड्या हे बीसीसीआयशी करारबद्ध खेळाडू आहेत त्यामुळे मुंबई इंडियन्सबरोबरचा सराव असला तरी त्यांनी बीसीसीआयची परवानगी अनिवार्य असेल. गेल्या महिन्यात शार्दुल ठाकूरने पालघरमध्ये बीसीसीआयची परवानगी न घेता सराव केल्यामुळे त्याला विचारणा करण्यात आली होती.

बापरे 'एवढे' रोईंगपटू दोषी...कुछ तो गडबड है..! वाचा सविस्तर...

श्रेयस अय्यरचा खुल्या मैदानात वॉर्मअप
वरळी आदर्श नगर येथे रहात असलेल्या श्रेयस अय्यरनेही आता खुल्या मैदानातील वॉर्मअप सुरू केला आहे. त्याच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानात भल्या पहाटे त्याने रनिंगचा सराव केला.