esakal | MIvsRR : मुंबईचं ठरले भारी!

बोलून बातमी शोधा

MIvsRR

MIvsRR : मुंबईचं ठरले भारी!

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

Mumbai Indians vs Rajasthan Royals 24th Match : सलामीवीर जोस बटलर 41 (32) आणि यशस्वी जयस्वाल 32(20)धावा करत पहिल्या विकेटसाठी केलेली अर्धशतकी भागीदारी आणि त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन 42 (27) आणि शिवम दुबेने 31 चेंडूत केल्या 35 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 4 बाद 171 धावा केल्या आहेत. डेविड मिलर 4 चेंडूत 7 आणि रियान पराग 7 चेंडूत 8 धावा करुन नाबाद राहिले. मुंबई इंडियन्सकडून राहुल चाहरने 2 तर बुमराह आणि बोल्ट यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. राजस्थानने दिलेले आव्हान मुंबईकरांनी सहज परतवून लावले. क्विंटन डिकॉकने नाबाद 70 धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्सने 7 विकेट्सनी सामना जिंकत स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवला आहे.

  • 146-3 : मिस्तफिझुरने घेतली कृणाल पांड्याची विकेट, त्याने 26 चेंडूत 39 धावा केल्या.

  • 83-2 : क्रिस मॉरिसला दुसरे यश, सुर्यकुमार यादव 10 चेंडूत 16 धावा करुन परतला

  • 49-1 : रोहित शर्माच्या रुपात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, क्रिस मॉरिसन 14 धावांवर केलं चालते

  • 158-4 : शिवम दुबे 31 चेंडूत 35 धावा करुन परतला, बुमराहला पहिले यश

  • 148-3 : राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन 27 चेंडूत 42 धावा करुन माघारी, बोल्टला मिळाले यश

  • 91-2 : संघाला दमदार सुरुवात करुन दिल्यानंतर यशस्वी जयस्वाल माघारी, 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 20 चेंडूत 32 धावा करणाऱ्या जयस्वाललाही राहुल चाहरनेच बाद केले

  • 66-1 :राहुल चाहरने राजस्थान रॉयल्सच्या संघाला पहिला धक्का दिला, 32 चेंडूत 41 धावा करणाऱ्या बटलरला क्विंटन डिकॉकने केले यष्टीचित

  • ईशान किशनला बाकावर बसवून मुंबई इंडियन्सने कुल्टर नाइलला संधी दिलीये. दुसरीकडे राजस्थानच्या संघाने कोणताही बदल केलेला नाही.

  • मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून घेतला फिल्डिंग करण्याचा निर्णय