IPL 2019 : पोलार्ड मुंबईचा 'लॉर्ड'; थराराक विजय

गुरुवार, 11 एप्रिल 2019

रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी आलेल्या किेएरॉन पोलार्डचा 31चेंडूतील 83 धावांचा घणाघात आणि त्यानंतर अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना वेस्ट इंडीजच्याच अलझारीने काढलेल्या दोन धावा यामुळे मुंबईने पंजाबचा 3 विकेटने पराभव करून आयपीएलमध्ये थराराक विजयाची नोंद केली.

मुंबई : रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी आलेल्या किेएरॉन पोलार्डचा 31चेंडूतील 83 धावांचा घणाघात आणि त्यानंतर अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना वेस्ट इंडीजच्याच अलझारीने काढलेल्या दोन धावा यामुळे मुंबईने पंजाबचा 3 विकेटने पराभव करून आयपीएलमध्ये थराराक विजयाची नोंद केली. 

केएल राहुलच्या शतकामुळे 197 धावा करणाऱ्या पंजाबच्या या आव्हानासमोर मुंबईचे पहिले तीन फलंदाज लवकर बाद झाले होते त्यानंतक पोलार्डने मोर्चा सांभाळला होता. हार्दिक पंड्यासह त्याने  19 चेंडूस 41 धावांची भागीदारी केली पण शमीच्या एकाच षटकात हार्दिक आणि क्रुणाल हे पंड्या बंधू बाद झाल्यावर खेळ खल्लास झाल्यातच जमा होता, परंतु पोलार्डने 18 चेंडूत 40 आणि त्यानंतर 21 चेंडूत 32 असे लक्ष्य अखेरच्या सहा चेंडूत 15 धावांची गरज असे आणून ठेवले होते. 

अखेरच्या षटकात पहिल्या नोबॉल चेंडूवर षटकार पुढच्या चेंडूवरही षटकार मारणारा पोलार्ड चार चेंडू चार धावांची गरज असताा बाद झाला त्यानंतर अलझारीने निराश होऊ दिले नाही.

राहुल आणि गेल यांची पहिल्या तीन षटकांत सुरुवात सावध होती, पण या चार षटकातली कसर गेलने एकाच षटकात भरून काढली बेहॅरेडॉफच्या षटकात तीन षटकार आणि एक चौकारासह त्यान 23 धावा वसूल केल्या तेथूनच त्यांनी गिअर बदलला.

अर्धशतकानंतर गेल काहीसा थकला, मैदानावरच उपचार घेतले पण पुढच्याच चेंडूवर बाद झाला. आणि मुंबईच्या गोलंदाजांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर पुढील पाच षटकांत मुंबई गोलंदाजांनी वेसण घातले होते.

मात्र अखेरची तीन षटके मुंबईला फारच महागडी ठरली. हार्दिक पंडच्या डावातील 19 व्या षटकांत राहूलने तीन षटकार आणि एका चौकारासह 25 धावा फटकावल्या आणि शतक अवाक्यात आणले आणि अखेरच्या षटकात शतकी मजल मारली.

संक्षिप्त धावफलक ः पंजाब (के एल राहुल नाबाद 100 -64 चेंडू, 6 चौकार, 6 षटकार, ख्रिस गेल  63 - 36 चेंड,  3 चौकार, 7 षटकार,   बेहरेडॉफ 35-1, बुमरा 38-1, हार्दिक पंड्या 57-2) 
मुंबई 20 षटकांत 7 बाद 197(डीकॉक २४ -२३ चेंडू, २ चौकार, सूर्यकुमार यादव 21 -15 चेंडू, 4 चौकार, पोलार्ड 83- 31 चेंडू 3 चौकार, 1षटकार, हार्दिक पंडया 19 -13 चेंडू, 2 चौकार, शमी 21-3)