धावांचा तडाखा तरीही मुंबई बाद 

prithvi
prithvi

मुंबई : पृथ्वी शॉचे आक्रमक अर्धशतक; तर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरच्या तडाखेबाज पाऊण शतकानंतर मुंबईचे मुश्‍ताक अली ट्‌वेंटी 20 स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात आले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने 22 चौकार आणि 13 षटकारांची आतषबाजी करीत मुंबईने पंजाबविरुद्ध 243 धावा फटकावल्या. मुंबईला सरस धावगतीवर पंजाबला हरवण्यासाठी त्यांना 153 धावांत रोखण्याची गरज होती. हे शक्‍य झाले नाही. 40 षटकांत जवळपास पाचशे धावा झालेल्या या सामन्यात शुभमन गिलच्या आक्रमक पाऊणशतकाने मुंबईला लक्ष्यापासून दूर ठेवले. मुंबई 22 धावांनी जिंकली, पण ते निव्वळ धावगतीच्या स्पर्धेत मागे पडले. अर्धशतकवीर पृथ्वी शॉने आदित्य तरेसह 41 चेंडूत 71 धावांची सलामी दिली; तर त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरने 63 चेंडूत 140 धावांचा तडाखा दिला, पण हे अपुरेच पडले. 

संक्षिप्त धावफलक - मुंबई ः 3 बाद 243 (पृथ्वी शॉ 53 - 27 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार, आदित्य तरे 21- 17 चेंडूत 3 चौकार, श्रेयस अय्यर नाबाद 80- 40 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकार, सूर्यकुमार यादव 80- 35 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकार) वि. वि. पंजाब ः 6 बाद 221 (शुभमन गिल 78- 38 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकार, अभिषेक शर्मा 47- 29 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार, गुरकिरत सिंग 40- 21 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार, शार्दुल ठाकूर 4-0-41-2, तुषार देशपांडे 4-0-35-2) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com