बांगलादेशचा प्रतिकार; 6 बाद 322 धावा

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

हैदराबाद - शाकीब अल हसन, मुशफिकूर रहिम आणि मेहदी हसन यांनी झळकाविलेल्या अर्धशतकामुळे बांगलादेशने भारताला कडवा प्रतिकार केला. भारतीय फिरकी गोलंदाजांना निष्प्रभ ठरवत रहिम आणि हसन यांनी आज (शनिवार) तिसऱ्या दिवसअखेरपर्यंत फलंदाजी करत 6 बाद 322 धावा केल्या

हैदराबाद - शाकीब अल हसन, मुशफिकूर रहिम आणि मेहदी हसन यांनी झळकाविलेल्या अर्धशतकामुळे बांगलादेशने भारताला कडवा प्रतिकार केला. भारतीय फिरकी गोलंदाजांना निष्प्रभ ठरवत रहिम आणि हसन यांनी आज (शनिवार) तिसऱ्या दिवसअखेरपर्यंत फलंदाजी करत 6 बाद 322 धावा केल्या

बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या द्विशतकासह फलंदाजांनी दाखविलेल्या बहारदार खेळाच्या प्रदर्शनानंतर गोलंदाजही सामन्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते. आजच्या दिवशी सुरवातीच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना झटपट बळी मिळविण्यात यश आले. मात्र, शाकीब आणि रहिम यांनी भारतीय गोलंदाजांना आणखी यश मिळू दिले नाही. शाकीब शतकाकडे वाटचाल करत असताना 82 धावांवर बाद झाला. त्यानंतर रहिमने हसनच्या साथीने दिवसअखेरपर्यंत फलंदाजी केली. 

त्यापूर्वी, भारताने रचलेल्या 687 धावांचा विशाल डोंगर घेऊन बांगलादेशचा संघ शुक्रवारी मैदानात उतरला. मात्र, त्यांना धावांची गती कायम राखता आली नाही किंवा एकाही फलंदाजांना मैदानावर जम बसवता आले नाही. या सामन्याच्या पहिल्याच डावात भारताने विक्रम प्रस्थापित केले. भारताने रचलेल्या धावसंख्या ही चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. सलग तीन डावात भारताने सहाशेहून अधिक धावांची मजल मारली. सलग चौथ्या मालिकेत विराट कोहलीने द्विशतक केले. कोहलीच्या सलग पाचव्यांदा दीडशेहून अधिक धावा झाल्या.

बांगलादेशची सुरूवात अडखळतच झाली. उमेश यादवने दोन बळी टिपले. तर इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्‍विनलाही प्रत्येकी एक बळी टिपण्यात यश आले. शकिब हसन 103 चेंडूत 82 धावा करून पतरला.

Web Title: Mushfiqur and Mehedi resist India in hyderabad test