INDvsBAN : सर्वांना प्रदूषणाची चिंता मात्र, मुशफिकूरला चिंता भलत्याच गोष्टीची

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

इतर सर्व खेळाडू आणि चाहत्यांना दिल्लीतील प्रदूषणाची चिंता सतावत असताना बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या मुशफिकूरला मात्र वेगळीच चिंता सतावत असल्याचा त्याने खुलासा केला आहे. 

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेला पहिला ट्वेंटी20 सामना सर्वांत ज्सात चर्चेत होता कारण दिल्लीतील प्रदूषण. दिल्लीतील हवेच्या दर्जाचा निर्देशांक 400च्या वर गेल्याने येथे सामना घेणे उचित नाही असे सर्वांचे म्हणणे होते. इतर सर्व खेळाडू आणि चाहत्यांना दिल्लीतील प्रदूषणाची चिंता सतावत असताना बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या मुशफिकूरला मात्र वेगळीच चिंता सतावत असल्याचा त्याने खुलासा केला आहे. 

Happy Birthday Virat Kohli : सुरवंटाचं फुलपाखरु झालं...

Image result for mushfiqur rahim

सामन्यानंतर बलताना तो म्हणाला, ''आम्ही कोणत्याही परिस्थीतत टेन्शन न घेता सामना खेळलो आणि म्हणूनच जिंकलो. सगळ्यांना दिल्लीच्या प्रदूषणाची चिंता होती मला मात्र, भारतीय गोलंदाजांचीच जास्त चिंता वाटत होती. आमच्यासाठी भारताला मायदेशात हरवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणतीच असू शकत नाही.''

रविवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात भारताचा धक्कादायक पराभव झाला होता. बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मुशफिकूरने आठ चौकार आणि एक षटकार मारक 60 धावा केल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mushfiqur rahim was worried about Indian bowlers