एंजल्सकडून इंदिरा नॅशनल प्रशालेला पराभवाचा धक्का

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

पुणे - एरिन नगरवाला प्रशाला आयोजित सोळा वर्षांखालील गटाच्या प्रिन्सिपॉल एन. डी. नगरवाला स्मृती करंडक आंतरशालेय सोळा वर्षांखालील गटाच्या फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात तनया मानेने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर उरुळी कांचनच्या एंजल्स प्रशालेने वाकडच्या इंदिरा इंटरनॅशनल प्रशालेचा पराभव केला.  

कल्याणीनगर येथील एरिन नगरवाला प्रशालेच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेतील एंजल्स आणि इंदिरा इंटरनॅशनल या सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडूंनी जोरदार खेळ केला. खेळाच्या तेराव्या मिनिटास एंजल्सच्या तनया मानेने पूजा म्हस्केच्या पासवर केलेला गोल निर्णायक ठरला. 

मुलांच्या गटात अभिषेक सूर्यवंशीने हॅटट्रिकसह सर्वाधिक सात गोल नोंदविताना केलेल्या जोरदार खेळाच्या जोरावर जे. एन. पेटिट प्रशालेने मातोश्री प्रशालेवर अकरा गोलच्या फरकाने मोठा विजय मिळविला. या लढतीत जे. एम. पेटिटच्या खेळाडूंचे पूर्ण वर्चस्व होते. त्यांनी पहिल्या मिनिटापासूनच वेगवान खेळ करीत गोल नोंदविले. त्यांच्या अभिषेक सूर्यवंशीने (१, ८, १५, १६, २० व २१ व २४ वे मिनीट) अथर्व लोणकर, क्षितिज नांदगुरे, मिहीर तुपे, निराज चव्हाणने दिलेल्या पासवर हॅटट्रिकसह तब्बल सात गोल केले. या स्पर्धेत हॅटट्रिक करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. 

अभिषेक सूर्यवंशीशिवाय वेदांत मुठेकरने (४ व २१ वे मिनीट) प्रणव ढगेच्या पासवर दोन; तर प्रणव ढगे व निरज चव्हाणने प्रत्येकी एक गोल केला.  लोणी काळभोरच्या एंजल्स प्रशालेने फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचा (एनएसबी) टायब्रेकमध्ये ६-४ अशा फरकाने पराभव केला. या लढतीत दोन्ही संघांतील खेळाडूंनी अतिशय वेगवान खेळ केला. खेळाच्या नवव्या मिनिटास एंजल्स प्रशालेच्या ओंकार नवलेने फ्री किकद्वारा गोल करून संघाचे खाते उघडले.  तेराव्या मिनिटास एनएसबीच्या रोहित आक्रने प्रतीक कदमने दिलेल्या पासवर गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर २०व्या मिनिटास एंजल्सच्या प्रथमेश काळभोरने ओंकार गुंजाळने दिलेल्या पासवर दुसरा गोल केला; तर २१ व्या मिनिटास एनएसबीच्या अथर्व दहीफळेने अजय पवारच्या पासवर गोल करून २-२ अशी बरोबरी केली.

निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटल्याने घेण्यात आलेल्या टायब्रेकमध्ये एंजल्स प्रशालेच्या ओंकार नवले, ओंकार गुंजाळ, प्रथमेश काळभोर व संग्राम काळभोर यांनी गोल केले. एनएसबीकडून अथर्व दहीफळे व रोहित आक्रे हे दोघेच गोल करू शकले. त्यांचे ओंकार तोडकर व ऋग्वेद खत्री गोल करण्यात अपयशी ठरल्याने त्यांना पराभूत व्हावे लागले.  

Web Title: N. D. Trophy inter-school football tournament