नदाल पुन्हा नंबर वन! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

ही स्पर्धा जिंकल्यामुळे फायदा होईल, पण पॅरिसमधील फ्रेंच ओपनमध्ये प्रत्येक गोष्ट वेगळी असेल. अर्थात, ही वेळ फ्रेंच ओपनचा जास्त विचार करण्यापेक्षा या जेतेपदाचा आनंद लुटण्याची आहे .- रॅफेल नदाल 

रोम  - स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पुन्हा मिळविले. माद्रिद ओपनमधील पराभवानंतर त्याची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली होती; पण आठव्या इटालियन विजेतेपदासह तो पुन्हा "नंबर वन' बनला. फ्रेंच ओपनपूर्वी हे घडणे नदालसाठी महत्त्वाचे ठरले आहे. 

नदालचा कट्टर प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर याने क्‍ले कोर्ट मोसमातून माघार घेतली आहे. खेळत नसूनही नदालच्या घसरणीमुळे तो क्रमवारीत वर सरकला होता. नदालने रोममध्ये कामगिरी उंचावत कारकिर्दीत सहाव्यांदा अव्वल क्रमांक पटकावला. 

नदालने सांगितले की, यंदा क्‍ले कोर्टवरील एक सर्वोत्तम सेट मी खेळलो. माझे फटके चांगले बसले.' 

ही स्पर्धा जिंकल्यामुळे फायदा होईल, पण पॅरिसमधील फ्रेंच ओपनमध्ये प्रत्येक गोष्ट वेगळी असेल. अर्थात, ही वेळ फ्रेंच ओपनचा जास्त विचार करण्यापेक्षा या जेतेपदाचा आनंद लुटण्याची आहे .- रॅफेल नदाल 

Web Title: nadal again on the top