स्टिफानोसविरुद्ध नदाल ‘मास्टर’

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

टोरांटो - ग्रीसचा आव्हानवीर स्टिफानोस त्सित्सिपास याची घोडदौड खंडित करीत स्पेनच्या रॅफेल नदाल याने रॉजर्स करंडक टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. दुसऱ्या सेटमध्ये एक सेटपॉइंट वाचवीत त्याने दोन सेटमध्ये ६-२, ७-६ (७-४) अशी बाजी मारली. स्टिफानोसने सातवा मानांकित डॉमनिक थीम (ऑस्ट्रिया), नववा मानांकित विंबल्डन विजेता नोव्हाक जोकोविच (सर्बिया), चौथा मानांकित केव्हिन अँडरसन (दक्षिण आफ्रिका) अशा खेळाडूंना हरवीत सलग सनसनाटी निकाल नोंदविले होते. नदालविरुद्ध दुसरा सेट त्याने टायब्रेकमध्ये घालविला, पण नदालने अनुभवाच्या जोरावर त्याला आणखी संधी दिली नाही. 

नदालची यशोमालिका 
एटीपी वर्ल्ड टूर मास्टर्स १००० मालिकेतील ३३वे जेतेपद
कारकिर्दीतील ८०वे विजेतेपद
‘मास्टर्स १०००’, ग्रॅंड स्लॅम मिळून ५०वे विजेतेपद
या कामगिरीमुळे मोसमाअखेरच्या क्रमवारीत अव्वल स्थानाची पाचव्यांदा संधी
रॉजर्स करंडक चौथ्यांदा जिंकला
यापूर्वी २००५, ८ व १३ मध्ये विजेता

Web Title: Nadal beats Tsitsipas in straight sets to win Rogers Cup