फेडरेशन करंडक ॲथलेटिक्‍स आजपासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नागपूर - पतियाळा येथील नेताजी सुभाष नॅशनल इन्सिट्यूट ऑफ स्पोर्टसच्या ट्रॅकवर गुरुवारपासून २१ व्या सिनिअर फेडरेशन करंडक ॲथलेटिक्‍स स्पर्धेला सुरवात होत असून, या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून जुलै महिन्यात भुवनेश्‍वर येथे होत असलेल्या आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान निश्‍चित करण्याचा ॲथलिट्‌सचा प्रयत्न आहे. आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत यजमान म्हणून भारताला प्रत्येक क्रीडा प्रकारात तीन प्रवेशिका पाठविण्याची मुभा आहे. त्यामुळेच फेडरेशन करंडक स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. चार दिवसांच्या या स्पर्धेत ११५० ॲथलिट्‌स सहभागी होत आहेत. 

आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेसोबतच लंडन येथे होणाऱ्या विश्‍व स्पर्धेसाठी असलेली पात्रता गाठण्याचा काही प्रमुख ॲथलिट्‌सचा प्रयत्न राहणार आहे. त्यात चारशे मीटरमध्ये पी. टी. उषाची शिष्या जिस्ना मॅथ्यू, एम. आर. पुवम्मा, अलिंदा थॉमस, पुरुषांत महंमद अनस, आरोक्‍य राजीव, गोळाफेकीत ओ. पी. सिंग कऱ्हाना, तिहेरी उडीत अरपिंदर सिंग, लांब उडीत अंकित शर्मा, शंभर मीटरमध्ये द्युतीचंद, आठशे मीटरमध्ये टिंटू लुका या प्रमुख ॲथलिट्‌सचा समावेश आहे. कामगिरीसोबत ॲथलिट्‌स नाडा (नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी) च्या रडारवर राहणार आहे. 

महाराष्ट्राचे एकूण ५० ॲथलिट्‌स सहभागी होत असून, त्यात नाशिकची संजीवनी जाधव, कविता राऊत-तुंगार, नागपूरची सायली वाघमारे, पुण्याचा कृष्णा राणे, गणेश सातपुते, स्वाती गाढवे, अर्चना अढाव, अंकिता गोसावी, नाशिकचा किसन तडवी, मुंबईचा स्टीपलचेसमधील सचिन पाटील, साताऱ्याचा कालिदास हिरवे, ठाण्याचा गौरांग आंब्रे यांच्याकडून पदकांची अपेक्षा केली जात आहे. 

ललिताची माघार
ललिता बाबर-भोसलेने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली असल्याचे सांगितले जात आहे. ललिताच्या अनुपस्थितीत मोनिका राऊत, प्रियांका चावरकर, ऐश्‍वर्या कल्याणकर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. 

Web Title: nagpur news Federation Trophy Athletics