धावण्याची धरली वाट, व्याधींनी सोडली पाठ

नंदकिशोर बूब
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

लहानपणापासून मला वेगवेगळे आजार झाले. १९७१ मध्ये मी तीन वर्षांचा होतो. आई कपडे धुण्यासाठी मला बरोबर घेऊन मुठा नदीवर गेली. तेथे मी पाण्यात पडलो. लोकांनी मला वाचविले, पण संधीवात झाला. तेरा वर्षांचा होईपर्यंत ८-९ डॉक्‍टर झाले. अखेर डॉ. कल्याण गंगवाल यांनी मला बरे केले. नंतर स्थिरावलो. आयुष्य बरे चालले होते, तोच २०१२ मध्ये व्हेरिकोस व्हेन्सने ग्रासले. ऐन दिवाळीत मी पाच दिवस ॲडमिट होतो. तेव्हा वजन ९९ किलो ६०० ग्रॅम झाले होते. त्याचवेळी मॉर्निंग वॉक सुरू केले. त्याचा फायदा दिसत असतानाच २०१४ मध्ये दुकानासमोरील ड्रेनेज लाइनचे दोन महिने चाललेले काम भोवले.

धुळीमुळे २० दिवस खोकला बरा झाला नाही. मेंदूला संसर्ग होऊन चेहऱ्याच्या अर्धांगवायूने ग्रासले. एका डॉक्‍टरांनी आता मरेपर्यंत घराबाहेर पडायचे नाही, असा इलाज सुचविला, पण मंदार पवार यांच्या जिममध्ये व्यायाम सुरू केला. माझ्या मुलांमुळे २०१५ मध्ये सिंहगड चढायला सुरवात केली. मला चेहऱ्याच्या अर्धांगवायूमुळे डबल आकृत्या दिसायच्या, पण मुलांनी मला आधार दिला.

सिंहगडामुळे ट्रेकची गोडी लागली. कात्रज ते सिंहगड मी आठ वेळा केले आहे. २०१६ मध्ये धावायला सुरवात केली. ३-५-६ अशी सुरवात केली. मी २१ किमी आठ वेळा धावलो असून दोन तास २३ मिनिटे माझी सर्वोत्तम वेळ आहे. १० किमी मी दहा वेळा धावलो आहे. माझ्यामुळे पत्नी नीला, भाऊ रामधन, त्याची पत्नी संगीता हेसुद्धा नऊ डिसेंबर रोजी धावणार आहेत.

आयुष्यात संयम ठेवल्यास खूप काही मिळते. त्याआधी प्रतिकूल परिस्थितीला मात्र सामोरे जावे लागते. किराणा मालाचा व्यापारी म्हटल्यावर काहींच्या नजरेसमोर येईल अशी प्रतिमा मी बदलू शकलो ती धावण्यामुळे. धावतोय तोपर्यंत कोणतेही दुखणे मागे लागणार नाही, असा विश्‍वास वाटतो.

Web Title: nandkishor boob participate pune half marathon