नस्तासे यांच्यावर सेरेनाची टीका 

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

"सेरनाचे अपत्य कोणत्या रंगाचे असेल याची उत्सुकता आहे. चॉकलेटी रंगात दुधासारखा पांढरा रंग मिसळला असेल का?' अशी टिप्पणी नस्तासे यांनी केली होती. त्यास "इन्स्टाग्राम'वर प्रत्युत्तर देताना सेरेनाने माया अँजेलोऊ यांच्या गाजलेल्या कवितेचा संदर्भ दिला.

न्यूयॉर्क - रुमानियाचे माजी टेनिसपटू ईली नस्तासे यांनी वर्णभेदी वक्तव्य केल्याबद्दल सेरेना विल्यम्सने टीका केली.

"सेरनाचे अपत्य कोणत्या रंगाचे असेल याची उत्सुकता आहे. चॉकलेटी रंगात दुधासारखा पांढरा रंग मिसळला असेल का?' अशी टिप्पणी नस्तासे यांनी केली होती. त्यास "इन्स्टाग्राम'वर प्रत्युत्तर देताना सेरेनाने माया अँजेलोऊ यांच्या गाजलेल्या कवितेचा संदर्भ दिला. "स्टील आय राईज' असे कवितेचे शीर्षक आहे. सेरेनाने म्हटले आहे, की आपण अशा समाजात राहतो, जेथे नस्तासेसारखे लोक माझ्या तसेच अद्याप जन्माला न आलेल्या बाळाविषयी असे वक्‍तव्य करू शकतात हे निराशाजनक आहे.

माझ्या समकालीन खेळाडूंविषयी ते अश्‍लील वक्तव्य करतात. तुम्ही जणू काही गोळीबाराप्रमाणे माझ्यावर (अप) शब्दांचा वर्षाव कराल, मला मारून टाकायचा प्रयत्न करू शकाल; पण मी हवेप्रमाणे उसळी घेईन.' नस्तासे यांच्यावर कारवाई केल्याबद्दल सेरेनाने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचे कौतुक केले. 
 

Web Title: Nastase will be the 'bad boy' if he says more about Serena Williams