महाराष्ट्राच्या अंकिता, दिशाला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

पुणे - भारतीय शालेय महासंघाच्या वतीने येथे सुरू असलेल्या 17 वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्राच्या अंकिता शिंदे आणि दिशा कारंडे यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. झोकात सुरवात करणाऱ्या तनुजा आल्हाट हिला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सोनाली मंडलिक ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली.

पुणे - भारतीय शालेय महासंघाच्या वतीने येथे सुरू असलेल्या 17 वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्राच्या अंकिता शिंदे आणि दिशा कारंडे यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. झोकात सुरवात करणाऱ्या तनुजा आल्हाट हिला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सोनाली मंडलिक ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली.

हवेली तालुका कला क्रीडा सामाजिक संस्थेच्या वतीने या स्पर्धेचे उत्तमनगर येथे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या मुलींनी चमकदार यश मिळविले. यातही कोल्हापूरच्या दिशाची लढत विलक्षण ठरली होती. अत्यंत संयमी लढणाऱ्या दिशाने बचावावर अधिक भर दिला. त्यामुळे सुरवातीला तिची दिल्लीची प्रतिस्पर्धी उन्नती हिने झटपट गुणांची कमाई केली. ताकद अजमावण्यापेक्षा प्रतिस्पर्धीला आव्हान देत उन्नतीने सुरवातीला दिशाला चुका करायला भाग पाडले आणि चार गुणांची कमाई करून पहिली फेरी 4-2 अशी जिंकली होती. दुसऱ्या तीन मिनिटांच्या फेरीत दिशाने राखून ठेवलेला दम कामी आला. तिने अखेरच्या काही सेकंदांत झटपट दोन गुण मिळवून 4-4 अशी बरोबरी साधली. नियमानुसार पिछाडी भरून काढणाऱ्या मल्लास विजयी घोषित केले जाते. याच आधारावर दिशा विजयी ठरली. दिशाने गेल्या वर्षी 43 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. पंजाबची संदीपा रौप्य, तर हरियानाची प्रियांका ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली.

राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या अंकिताने मोळी डावाचा सुरेख वापर करून प्रतिस्पर्धी शालिनीवर गुणांवर मात केली. गेल्या वर्षी राज्य स्पर्धेत ती रौप्यपदकाची मानकरी ठरली होती. हरियाणाची प्रियांका आणि सीबीएससीची मुंगी ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली.

अंतिम निकाल (अनुक्रमे सुवर्ण, रौप्य, ब्रॉंझ)
मुले ः 38 किलो ः रविना (हरियाणा), भाविका (गुजरात), रोशनी (दिल्ली), विशाखा (मध्य प्रदेश), 43 किलो ः संजू (हरियाणा), आरती (दिल्ली), आरती (मध्य प्रदेश), सोनाली, 65 किलो ः सुषमा शोकिन (हरियाना), तुनजा आल्हाट (महाराष्ट्र), पी. सुलोचना (छत्तीसगढ), अर्शप्रीत (पंजाब).

Web Title: National School Wrestling