बर्थडे बॉय नीरज चोप्रा म्हणाला, देवानेच भालाफेकीसाठी निवडले

Neeraj Chopra Birthday : नीरज चोप्रा म्हणाला, देवानेच भालाफेकीसाठी निवडले
Neeraj Chopra Age
Neeraj Chopra Ageesakal

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राचा आज ( दि. २४ डिसेंबर) वाढदिवस (Neeraj Chopra Birthday) आहे. नीरज चोप्राने नुकतेच २४ व्या वर्षात (Neeraj Chopra Age) पदार्पण केले आहे. नीरजने ७ ऑगस्ट २०२१ मध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करत इतिहास रचला होता. त्यानंतर नीरज चोप्रा हा भारतीयांच्या गळ्यातील ताईद झाला होता.

दरम्यान, प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर नीरज चोप्राने अनेक जणांना मुलाखती दिल्या होत्या. अशाच एका मुलाखतीत त्याने आपण भालाफेकीकडे (Javelin) कसे वळालो हे सांगितले. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की तो लठ्ठपणावर मात करण्यासाठी खेळाकडे वळला होता.

Neeraj Chopra Age
व्हेगन कर्णधार 'बिर्याणी' निवडणार नाही का : जाफरचा सवाल

नीरज चोप्राने (Neeraj Chopra) या मुलाखतीत सांगितले की तो अपघातानेच भालाफेकीकडे वळला. तो म्हणाला, 'देवानेच माझ्यासाठी भालाफेकीची निवड केली. मी माझ्या गावात वेगवेगळे खेळ खेळत होतो. एका विशिष्ट खेळाची मी निवड केली नव्हती. पण, मी काही वरिष्ठ खेळाडू हवेत भाला फेकताना मी पाहिलं आणि मी त्यांच्याच सामिल झालो.' नीरज चोप्राने निरागसपणे सांगितले ती त्यावेळी त्याला भालाफेक काय असते हे माहिती देखील नव्हते. तो म्हणाला की, मला भालाफेक म्हणते काय हे देखील माहिती नव्हते. भालाफेकीची सुरुवात अशी झाली होती. आता मी इथं पर्यंत येऊन पोहचलो आहे.'

Neeraj Chopra Age
मेलबर्न स्टार्सला डाव सुरु करण्यापूर्वीच का मिळाल्या ५ धावा?

दरम्यान, ७ ऑगस्ट २०२१ नंतर प्रत्येक भारतीयाच्या तोंडात नाव असलेल्या नीरज चोप्राला त्याच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), नारायण राणे (Narayan Rane), मनोहरलाल खट्टर(Manohar Lal Khattar) यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com