World Cup 2019 : नीशॅम-ग्रँडहोमने न्यूझीलंडला सावरले 

cricket
cricket

बर्मिंगहॅम : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आत्तापर्यंत झालेल्या सामन्यात भारतासह अपराजित रहाणाऱ्या न्यूझीलंड फलंदाजीला प्रथमच आव्हान मिळाले.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांना प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 237 एवढीच मजल मारता आली. यामध्ये जिमी नीशॅम आणि ग्रॅंडहोम यांच्या 128 चेंडूतील 132 धावांच्या भागीदारीचे योगदान मोल्यवान ठरले. 

पावसामुळे मैदान ओलसर असल्यामुळे एक तास उशिरा सुरु झालेल्या या सामन्यात ढगाळ वातावरणही न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा धासडी निर्णय घेतला परंतु पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याससमोर त्यांची 5 बाद 83 अशी अवस्था झाली. या धावा करतानाही त्यांनी अर्धी षटके खर्ची घातली होती. दोनशे धावांचाही टप्पा कठिण वाटत होता, परंतु निशॅम आणि ग्रॅंडहोम यांनी हात दिला. निशामचे शतक अवघ्या तीन धावांनी अपूर्ण राहिले. 

आत्तापर्यंतच्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांवर हुकूमत गाजवणाऱ्या न्यूझीलंड फलंदाजीला आज खऱ्या अर्थाने आव्हान मिळाले. पहिल्या पाचपैकी तिघांना जेमतेम खाते उघडता आले. त्यांच्या या पडझडीची सुरुवात महम्मद आमीरने आपल्या पहिल्याच चेंडूवर केली मार्टिन गुप्तीलने बाहेर जाणारा चेंडू यष्टींवर ओढावून घेतला. त्यानंतर दुसरा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने कॉलिन मुन्रो, रॉस टेलर आणि लॅथम ही न्यूझीलंडची मधली फळी गारद केली. 

सलग दोन शतके करणारा केन विलियमसन आत्मविश्‍वासाने फलंदाजी करत होता. 41 धावाही त्याने केला, पण तोही आफ्रिदीचा बळी ठरला तेव्हा न्यूझीलंडवर खऱ्या अर्थाने दडपण आले होते. नीशॅम आणि ग्रॅंडहोम यांच्याकडे डाव सावरण्यावर भर देण्याशिवाय पर्या नव्हता. धावगतीकडे त्यांनी दूर्लक्ष केले. अखेरच्या दहा षटकानंतर त्यांनी बॅट फिरवण्यास सुरुवात केली. नीशॅमचा प्रहार एवढा जबरदस्त होता की त्याने आत्तापर्यंत एकही षटकार न स्वीकारणाऱ्या आमीरचा चेंडूही प्रेक्षकांमध्ये भिरकावला. दोनशे धावा पार करण्याचा आत्मविश्‍वास मिळाल्यानंतर अडीचशे धावांचे लक्ष्य ठरवले, परंतु तेवढ्यात ग्रॅंडहोम धावचीत झाला. 

संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 50 षटकांत 6 बाद 237 (केन विलियमसन 41 -114 चेंडू, 4 चौकार, जिमी नीशॅम नाबाद 97 -112 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार, कॉलिन ग्रॅंडहोम 64 -71 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, महम्मद आमीर 10-0-67-1, शाहीन आफ्रिदी 10-3-28-3)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com