संघर्षपूर्ण लढतीत साईप्रणीतचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

ऑकलंड (न्यूझीलंड) - भारताच्या बी. साईप्रणीतचे न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान आटोपले असले, तरी त्याने दुसऱ्या मानांकित जोनाथन ख्रिस्तीला कडवा प्रतिकार केला. उपांत्य फेरीच्या लढतीत शनिवारी जोनाथनने त्याचा २१-१४, १९-२१, ८-२१ असा पराभव केला. 

साईप्रणीतला स्पर्धेत तिसरे मानांकन होते. त्याने पहिली गेम अगदी सहज जिंकत झकास सुरवात केली. दुसऱ्या गेममध्येही तो आघाडीवर होता. गेम अखेरच्या टप्प्यात असताना १९-१९ अशी बरोबरी होती. दोघांनाही समान संधी होती. त्या वेळी जोनाथनने सलग दोन गुण घेत गेम जिंकली. यानंतर मात्र त्याने मागे वळून बघितले नाही. तिसऱ्या गेमला जोनाथनचा खेळ अधिक सरस झाला. साई प्रणित त्याचा सामना करू शकला नाही. विजेतेपदासाठी जोनाथनची गाठ आता अव्वल मानांकित लिन डॅनशी पडणार आहे. त्याने कोरियाच्या क्वांग ही हेओ याचा २१-१६, २१-१६ असा पराभव केला. 

Web Title: new zealand open badminton competition