World Cup 2019 : चार षटकांत तीन विकेट; भारताला 240चे आव्हान

World Cup 2019 : चार षटकांत तीन विकेट; भारताला 240चे आव्हान

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : पावसामुळे काल (ता.9) सेमी फायनलचा खेळ खंडोबा झाल्यानंतर आज राखीव दिवशी पुन्हा खेळाला सुरवात झाली. कालप्रमाणेच भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत चार षटकांत न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना बाद केले. आता पाऊस न पडल्यास भारताला 50 षटकांमध्ये 240 धावांचे आव्हान आहे. 

आज खेळाला पुन्हा सुरवात झाल्यावर किवींना फक्त चार षटके फलंदाजी करायची होती. या चारही षटकांत भुवनेश्वर कुमार आणि जसप्रित बुमरा या दोन प्रमुख गोलंदाजांनी गोलंदाजी केली. याचार षटकांत त्या दोघांनी केवळ 29 धावा दिल्या. 

ढगाळ वातावरणाचा धसका घेत केन विल्यमसनने काल प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी शिस्त पाळून गोलंदाजी केल्याने न्युझिलंडला 46.1 षटकांमधे 5 बाद 211 धावा काढता आल्या. कप्तान केन विल्यमसनने 67 आणि रॉस टेलरने नाबाद 67 धावा करून धावसंख्येचा मुख्य भार नेहमीप्रमाणे पेलला. मात्र, 211 धावा केल्यावर पावसाला सुरवात झाल्याने खेळ थांबविण्यात आला. अखेर पाऊस न थांबल्याने खेळ रद्द करुन आज घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

कालच्या सामन्यात नाबाद राहिलेल्या टेलरला जडेजाने अप्रतिम धावाबाद करत 73 धावांवर माघारी पाठविले. पुढच्याच षटकात भुवनेश्वरने टाकेलेल्या पहिल्याच चेंडूवर जडेजानेच टॉम लॅथमचा झेल घेत त्यालाही 10 धावांवर माघारी पाठविले. त्याच्याच षटकात अखेरच्या चेंडूवर विराटने हेन्री निकोल्सला झेल टीपला. 

आता फिरकीला मदत मिळत असल्याने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर विजयाकरता भारतीय फलंदाजांना मान खाली घालून फलंदाजी करावी लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com