World Cup 2019 : न्यूझीलंड जिंकलं तर ट्रॉफी उद्या मिळणार

World Cup 2019 : न्यूझीलंड जिंकलं तर ट्रॉफी उद्या मिळणार

वर्ल्ड कप 2019 : लॉडर्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात एक अजब गोष्ट घडण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडने जर आजच्या फायनलमध्ये विजय मिळवला तरी त्यांना ट्रॉफी मात्र आज मिळणार नाही.  

न्यूझींलडचा कर्णधार केन विल्यम्सन याने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना लॉर्ड्सवर सुरु आहे आणि इतिहासाप्रमाणे लॉर्ड्सवर प्रथम फलंदाजी करणाच संघ जिंकला आहे. त्यामुळे आज जर असे झाले तर न्यूझीलंड जिंकण्याची शक्यता आहे. मात्र, ते जिंकले तरी त्यांना आज ट्रॉफी मिळणार नाही. 

त्याचे कारण असे आहे की, इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन देशांत 11 तासांचा फरक आहे. त्यामुळे आज रात्री इंग्लंडमध्ये जर किवींनी विजय मिळवला आणि ट्रॉफी पटकाविली तर तोपर्यंत न्यूझीलंडमध्ये पहाट झालेली असेल. त्यामुळे किवी खेळाडू जेव्हा ट्रॉफी उंचावतील तेव्हा त्यांच्या देशात नवी पहाट झालेली असेल. त्यामुळे त्यांच्या देशवासीयांच्या दृष्टीने त्यांना ट्रॉफी आज नाही तर उद्या मिळेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com