पैसे अर्धे द्या पण मला बार्सिलोनात येऊ द्या : नेमार

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

फॉर्मात असताना बार्सिलोना क्‍लबशी काडीमोड घेत विक्रमी किंमतीत पीएसजी क्‍लबशी करार करणाऱ्या ब्राझीलच्या नेमारची डाळ या नव्या क्‍लबमध्ये शिजली नाही. परिणामी तो पुन्हा बार्सिलोना क्‍लबमध्ये येण्यास उत्सुक आहे.

बार्सिलोना : फॉर्मात असताना बार्सिलोना क्‍लबशी काडीमोड घेत विक्रमी किंमतीत पीएसजी क्‍लबशी करार करणाऱ्या ब्राझीलच्या नेमारची डाळ या नव्या क्‍लबमध्ये शिजली नाही. परिणामी तो पुन्हा बार्सिलोना क्‍लबमध्ये येण्यास उत्सुक आहे. त्यासाठी पीएसजीबरोबर केलेल्या करारापेक्षा अर्धिक रक्कम दिली तरी नेमारने ही उत्सुकता दाखवली आहे. 

बार्सिलोना क्‍लब सोडताना नेमारने या क्‍लबचे व्यवस्थापन तसेच असंख्य पाठीराखांनाही निराश केले होते. या प्रेक्षकांची आपण माफी मागण्यास तयार असल्याचे नेमार म्हणणे असल्याचे बोलले जात आहे. नेमारने पाच वर्षांचा हा नवा करार तोंडी मान्य केल्याचे समजत. 

ज्या खेळाडूंना क्‍लब सोडून जायचे असेल त्यांच्या मध्ये आम्ही येणार नाही, परंतु नेमारने हा क्‍लब सोडून जाऊ नये अशी आमची इच्छा आहे, असे पीएसजी क्‍लबचे प्रमुख नासीर अल खेलिफी यांनी सांगितले. नेमारने पीएसजीबरोबर 3 कोटी 28 लाख डॉलरचा करार केलेला आहे. 

नेमार रेयाल माद्रिदमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे, परंतु कोणत्याही परिस्थितीत बार्सिलोनाशी या पुढे करार न करण्याची हमी दिली तरच रेयाल माद्रिदचे दरवाजे उघडे होतील असेही बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neymar Jr wats to join Barcelona again