पालिकेचा फार्मासिस्ट निखिल ‘आयर्नमॅन’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

पुणे महापालिकेतील वैद्यकीय विभागाचा फार्मासिस्ट निखिल जक्कल याने पहिल्या प्रयत्नात आयर्नमॅन शर्यत पूर्ण केली. फ्रान्समधील विची येथील शर्यतीत त्याने यश मिळविले.

पुणे- पुणे महापालिकेतील वैद्यकीय विभागाचा फार्मासिस्ट निखिल जक्कल याने पहिल्या प्रयत्नात आयर्नमॅन शर्यत पूर्ण केली. फ्रान्समधील विची येथील शर्यतीत त्याने यश मिळविले.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा 

निखिलने रोडबाईक (सायकल) खरेदी करण्यापासून सुरवात केली. व्यावसायिक तत्त्वावर प्रशिक्षण घेणे शक्‍य नसल्यामुळे त्याने इंटरनेटवरून माहिती घेत स्वतःच ट्रेनिंग प्लॅन बनविला. याविषयी त्याने सांगितले की, ‘रोज पहाटे साडेपाच ते साडेसात या वेळेत ट्रेनिंग केले. सोमवार ते शनिवार पोहणे, सायकलिंग आणि धावणे, तर रविवारी हे तिन्ही एकत्र दहा तास असे नियोजन होते.’

नावनोंदणी केल्यानंतर संयोजकांनी ऐनवेळी सायकलिंगचा मार्ग बदलला. त्यात १८० किलोमीटरपैकी निम्मा घाटाचा मार्ग होता. त्यामुळे निखिलने रविवारी आलटून पालटून कात्रज घाट सलग चार वेळा व मुठाखिंड सलग सहा वेळा असा सराव सुरू केला. सुमारे साडेतीन तासांत हे पूर्ण होणे अपेक्षित असताना एक तास जास्त लागत होता. त्यामुळे तो हताश झाला होता. अशा वेळी त्याने पुण्याचे अनिर्बन मुखर्जी आणि बंगळूरचे श्रीकांत देसिकचार या आयर्नमॅन फिनिशर्सशी संपर्क साधला. त्यांनी घाट मार्गावरील सराव वाढविण्यास सांगितले. त्याच सुमारास पुण्यात जोरदार पाऊस पडत होता. तरीही निखिलने खंड पडू दिला नाही. पाच रविवार मुसळधार पावसात त्याने घाट सरावाचे नियोजन पूर्ण केले. याशिवाय घरी सायकलला टर्बो ट्रेनर लावून घरी पाच रविवारी सायंकाळी सुमारे चार तास सराव केला.

विचीमध्ये दाखल झाल्यानंतर त्याने सायकलिंगच्या मार्गावर प्रॅक्‍टिस राईड केली, तर नदीत पोहण्याचा सराव केला. १८ अंश सेल्सिअस तापमानामुळे पाणी बरेच थंड असल्यामुळे निखिलने वेटसुट भाड्याने घेतला आणि तो घालून सराव केला. या कामगिरीबद्दल निखिलचा वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अशी झाली शर्यत
  पोहण्याचा टप्पा पहाटे सहा वाजता सुरू
  ३.९ किलोमीटर अंतरासाठी २ तास २० मिनिटे कट-ऑफ असताना निखिलकडून १ तास ३९ मिनिटांत हा टप्पा पूर्ण
  सायकलिंगच्या टप्प्यास निर्धाराने प्रारंभ
  ८७ किमीनंतर ३४ अंश सेल्सिअस तापमानामुळे दमछाक
  त्यानंतरही शर्यत जिद्दीने पूर्ण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nikhil Jakkal won the race in Vichy

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: