नितीश कुलकर्णी बनले आयर्नमॅन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

कोल्हापूर - वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बसलटन येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत नितीश हेमंत कुलकर्णी आयर्न मॅनचा किताब पटकवला. त्यांनी ११ तास ४१ मिनीटात ही स्पर्धा पूर्ण करून त्यांनी हे यश मिळवत कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापार पोहचवले. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बसलटन येथे २ डिसेंबरला आयर्नमॅन स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत जगभरातून २३०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा कोणतीही विश्रांती न घेता पूर्ण करायवयाची होती. त्यात जेलीफिश, शार्क अशा समुद्री हिंस्त्र माशांचा समावेश आणि अतिशय थंड पाण्याचा प्रवाह असलेल्या समुद्रातून चार कि.मी. पोहणे, १८० कि.मी. सायकलिंग आणि ४२ कि.मी. धावण्याचा समावेश होता. शारीरिक व मानसिकतेचा कस पाहणारी ही स्पर्धा १७ तासात पूर्ण करणे आवश्‍यक होते. कोल्हापूरचे नितीश कुलकर्णी यात सहभागी झाले होते. त्यांनी स्पर्धेचे अंतर अवघ्या ११ तास ४१ मिनीटात पूर्ण करून आयर्न मॅनचा किताब पटकवला.

स्पर्धेदरम्यान त्यांनी ३४ अंश तापमानाचा वातावरणाचा सामना केला. स्पर्धेसाठी ते एक वर्षापासून तयारी करत होते. त्यांना दीपकराज, धैर्यशील चव्हाण, स्विमींग कोच विजय मांगले, पंकज रावळु यांनी मार्गदर्शन केले. त्यांना आई वैशाली कुलकर्णी, वडील हेमंत कुलकर्णी यांच्यासह कुटुंबाची साथ मिळाली.

Web Title: Nitish Kulkarni becomes Ironman