महंमद हफिझला पाक मंडळाची नोटीस

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

कराची - गोलंदाजीच्या संशयास्पद शैलीबाबतच्या आयसीसीच्या नियमावर टीका केल्यामुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू फिरकी गोलंदाज महंमद हफिझला पाक मंडळानेच नोटीस बजावली आहे. 

मुळात महंमद हफिझची गोलंदाजीची शैली संशयास्पद होती. त्याच्यावर बंदीही घालण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांत तीनदा शैलीत बदल केल्यानंतर त्याला खेळण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे त्याने शैलीच्या नियमावर तोंडसुख घेतले. आता शैलीत सुधारणा झाली, तरी केलेल्या वक्‍तव्यामुळे तो पुन्हा संकटात सापडला आहे.

शैली वादग्रस्त ठरवली जात असताना काही बाह्य शक्तींचा प्रभाव पडत असतो. कधी कधी क्रिकेट मंडळांकडूनही दडपण टाकले जात असते आणि काही वेळा कोणीही पाठीशी उभे राहत नसते, अशी टीका हफिझने केली होती. काही गोलंदाजांचा हात गोलंदाजी करताना ३५ अंश कोनात वाकतो; पण त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि माझा हात १६ अंश कोनातून वाकला तरी कारवाई होते, असेही हफिझचे म्हणणे आहे.  मुलाखतीसाठी मंडळाची परवानी घेतल्याचा दावा त्याने केला.

Web Title: Notice of the Pakistan Board of Mohammed Hafeez