Novak Djokovic French Open : नोव्हाक जोकोविचच्या छातीवर सिक्रेट चिप; यशस्वी कारकिर्दीचं रहस्य केलं उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Novak Djokovic French Open Chip On Chest

Novak Djokovic French Open : नोव्हाक जोकोविचच्या छातीवर सिक्रेट चिप; यशस्वी कारकिर्दीचं रहस्य केलं उघड

Novak Djokovic French Open Chip On Chest : टेनिस इतिहासातील सर्वोत्तम पुरूष टेनिसपटूंपैकी एक असलेला नोव्हाक जोकोविच सध्या फ्रेंज ओपन खेळत आहे. त्याने आतापर्यंत 22 ग्रँडस्लॅम जिंकले असून राफेल नदालच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली असून फ्रेंच ओपनमध्ये नदालच्या अनुपस्थितीत जोकोविचला हा विक्रम मोडण्याची संधी आहे.

दरम्यान, नोव्हाक जोकोविच एका वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध झोतात आला. जोकोविचचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात जोकोविचच्या छातीवर एक चिप लावलेली दिसत आहे. ही चिप काय आहे याबाबत सर्वजण चर्चा करत आहेत. जोकोविचने या चिपबाबत खुलासा केला की तो त्याची खेळातील क्षमता वाढवण्यासाठी एक अद्भुत आणि परिणामकारक नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत. ज्या इटालियन कंपनीने या चिपची निर्मिती केली आहे त्यांनी देखील असाच दावा केला आहे.

जोकोविचच्या टीमने देखील सामन्यादरम्यान ही चिप बदलली होती. चिप बॉल गर्लमार्फत जोकोविचपर्यंत पोहचवण्यात आली. दरम्यान, समालोचकाने ऑन एअर म्हणाला की, 'नोव्हाकला काही तरी चिकटवण्यात आलं आहे. तू पाहिलंस का रॉबर्ट मला वाटतं की नोव्हाक हा आयर्न मॅन आहे.'

सामन्यानंतर नोव्हाक जोकोविचला देखील या चिपबाब विचारण्यात आले. त्यावेळी तो विनोद करत म्हणाला की, 'ज्यावेळी मी लहान होतो त्यावेळी मला आयर्न मॅन आवडायचा. त्यामुळे मी आयर्नमॅन सारखा वागायचो.' जोकोविच पुढे म्हणाला की, माझ्या टीमने मला अत्यंत उपयुक्त अशी नॅनोटेक्नॉलॉजी दिली आहे. यामुळे माझी टेनिस कोर्टवरील कामगिरी सुधारण्यास मदत होत आहे. हे माझ्या यशस्वी कारकिर्दीच मोठं रहस्य आहे. ही चिप नसती तर मी इंथ बसलोच नसतो.'

(Sports Latest News)