नोव्हाक जोकोविचचा पहिल्या फेरीतच पराभव

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

रिओ डी जानिरो - जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला रिओ ऑलिंपिक स्पर्धेत पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे जोकोविचचे ऑलिंपिकचे पदक जिंकण्याचे स्वप्न अद्याप अपूर्णच राहिले.

पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यातच अर्जेंटिनाच्या ज्युआन मार्टीन डेल पोट्रो याच्याकडून 7-6(7-4), 7-6 (7-2) असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर जोकोविचला अश्रू अनावर झाले होते. तर, डेल पोट्रोला जोकोविचचा पराभव केल्यामुळे अश्रू आवरले नाहीत. पोट्रोच्या मनगटावर तीनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली असून, तो जवळपास निवृत्तीच्या उंबरठ्यावर होता. जागतिक क्रमवारीतही तो 145 व्या स्थानावर पोहचला होता. पण, त्याने पुन्हा पुनरागमन करत जोकोविचसारख्या मातब्बर खेळाडूचा पराभव केला.

डेल पोट्रोने लंडन ऑलिंपकमध्ये जोकोविचचा ब्राँझपदकासाठी झालेल्या सामन्यात पराभव केला होता. आता पुन्हा एकदा जोकोविचची ऑलिंपिक पदकाची आशा लांबणीवर पडली आहे. दोन्ही सेटमध्ये कडवी लढत पहायला मिळाली. टायब्रेकरमध्ये झालेल्या या दोन्ही सेटमध्ये डेल पोट्रोने यश मिळविले.

Web Title: Novak Djokovic crashes out of Rio Olympics