जोकोविच दहाव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत

Dnyaneshwar
मंगळवार, 4 जून 2019

पॅरिस : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. सलग दहाव्यांदा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाताना त्याने जर्मनीच्या यान लिनार्ड स्टर्फ याचा 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला.
जोकोविचच्या झंझावातासमोर स्टर्फचा निभाव लागला नाही. जोकोविचने ही लढत अवघ्या 1 तास 33 मिनिटांत जिंकली.

महिला एकेरीत गत उपविजेत्या स्लोआनी स्टिफन्स हिने माजी विजेत्या गार्बिन मुगुरुझा हिचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्लोआनीने ही लढत 6-4, 6-3 अशी सहज जिंकली. अमेरिकेच्या 14व्या मानांकित मेडिसन किज हिनेदेखील आपली आगेकूच कायम राखताना कॅटरिना सिनिआकोवा हिचे आव्हान 6-2, 6-4 असे संपुष्टात आणले. मेडिसनने सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
पुरुष एकेरीत जपानच्या केई निशिकोरी याने पाच सेटच्या संघर्षपूर्ण लढतीत बेनॉइट पैरे याचे आव्हान संपुष्टात आले. निशिकोरीने लढत 6-2, 6-7(6-8), 6-2, 6-7(6-8), 7-5 अशी जिंकली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Novak Djokovic reaches tenth French Open quarter finals