Novak Djokovic : अजून बरेच टेनिस शिल्लक : जोकोविच

सर्बियाचा २१ वेळा ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविच याने आपण इतक्यात टेनिसविश्वातून निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट केले
novak djokovic statement  on retirement i still want to play high level tennis sport
novak djokovic statement on retirement i still want to play high level tennis sportsakal

तेल अवीव : सर्बियाचा २१ वेळा ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविच याने आपण इतक्यात टेनिसविश्वातून निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तेल अवीव ओपन टेनिस स्पर्धा खेळण्याकरिता आलेल्या नोवाक जोकोविचने पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे, की ‘‘मी जरी या वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन आणि यूएस ओपन स्पर्धेत सहभागी झालो नसलो, तरी माझ्यात अजून बरेच टेनिस शिल्लक असून माझ्यात टेनिस खेळायची बरीच भूक अजूनही बाकी आहे.

मी टेनिस खेळताना बरेच काही साध्य केले असले, तरी मला अजून टेनिस खेळायचे आहे. त्याने एटीपी टूरशी संवाद साधताना वरील वक्तव्य केले आहे. तसेच जोकोविचने रॉजर फेडररच्या निवृत्तीवरसुद्धा भाष्य केले असून, ‘‘रॉजरने आतापर्यंत टेनिस खेळाला बरेच काही दिले असून तो जगातील सर्वांत यशस्वी आणि आदरणीय खेळाडूंपैकी एक आहे. रॉजरची निवृत्ती ही संपूर्ण टेनिस विश्वासाठी दुःखदायक घटना असल्याचेही जोकोविच म्हणाला. जोकोविचने कोविड प्रतिबंधक लस घेतली नसल्याने तो २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन आणि यूएस ओपन टेनिस स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com