मलिंगा पाठोपाठ श्रीलंकेच्या 'या' प्रमुख खेळाडूचीही निवृत्ती

 nuwan kulasekara retires from International Cricket
nuwan kulasekara retires from International Cricket

कोलंबो : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकरा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कुलसेकरा 21 कसोटी, 184 एकदिवसीय आणि 58 टी 20 सामने खेळला आहे.

कुलसेकरा 2017 मध्ये राष्ट्रीय संघातून अखेरचा सामना खेळला होता. त्याने 2005 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. 

नुकतेच श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने सुद्धा निवृत्ती जाहीर केली आहे. तो बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचे कर्णधार दिमुथ करुणारत्नेने सांगितले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com