esakal | NZ vs PAK 2nd Test: केन विलियमसनची शतकी हॅटट्रिक, पाकिस्तान बॅकफूटवर
sakal

बोलून बातमी शोधा

nz vs pak 2nd test, Cricket Record,kane williamson

पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने 140 चेंडूत शतकाला गवसणी घातली. त्याचे हे  24 वे शतक आहे. अर्धशतकासाठी त्याने तब्बल 105 चेंडूचा सामना केला.

NZ vs PAK 2nd Test: केन विलियमसनची शतकी हॅटट्रिक, पाकिस्तान बॅकफूटवर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

New Zealand vs Pakistan 2nd Test : न्यूझीललंडचा कर्णधार केन विलियमसनने (Kane Williamson) आपला फॉर्म कायम ठेवत पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आणखी एक शतक झळकावले आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील शतकाच्या जोरावर आयसीसीच्या फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी पोहचलेल्या विलियमसनचे हे सलग तिसरे शतक आहे.

पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने 140 चेंडूत शतकाला गवसणी घातली. त्याचे हे  24 वे शतक आहे. अर्धशतकासाठी त्याने तब्बल 105 चेंडूचा सामना केला. त्यानंतर पुढील 35 चेंडूत शतकाला गवसणी घातली. मागील तीन सामन्यातील केन विलियमसनचे हे तिसरे शतक आहे. यापूर्वी वेस्ट इंडिज विरुद्धच्या हेमिल्टन कसोटी सामन्यात त्याने 251 धावांची खेळी केली होती. पाकिस्तान विरुद्धच्या माउंट मानगगुईच्या कसोटी सामन्यात त्याने 129 धावा ठोकल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत केन संघाच्या धावसंख्येत किती धावांची भर घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

"ब्रिस्बेनमधील ऑस्ट्रेलियन संघाच्या रेकॉर्डमुळे टीम इंडियाला धडकी भरलीय"

पाकिस्तानी संघाने पहिल्या डावात 297 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात मोठी आघाडी घेऊन पाकिस्तानला व्हाईट वॉश करण्याची न्यूझीलंडला संधी आहे. नव्या वर्षातील कसोटी मालिकेत न्यूझीलंडही कमाल करुन दाखवणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. टॉम लॅथम (33) आणि टॉम ब्लुडेंल (16) धावा करुन स्वस्तात माघारी फिरल्यानंतर रॉस टेलरचा खेळही अवघ्या 12 धावांवर थांबला.

त्यानंतर कर्णधाराला साजेसा खेळ करत विलियमसनने संघाचा डाव सावरला. हॅन्री निकोलस त्याला उत्तम साथ देत असून तोही अर्धशतक पूर्ण करुन शतकी खेळीकडे वाटचाल करत आहे. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी, मोहम्मद अब्बास आणि फहिम अश्रफ यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

loading image