
NZ vs SL: किवींने दुसऱ्या दिवशी घातला गोंधळ! लंकेने वाढवले भारताचं टेंशन; WTC फायनलचे काय आहे समीकरण?
NZ vs SL 1st Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा व निर्णायक कसोटी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात आहे. कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे आणि कांगारूने 4 बाद 357 धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा 155, तर कॅमेरून ग्रीन 100 धावांवर खेळत आहे. भारतासाठी हा निर्णायक कसोटी सामना खुप महत्त्वाचा आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठायची असेल तर भारताला हा सामना जिंकावाच लागेल. जर का भारताचा पराभव झाला तर सर्व काही न्यूझीलंड-श्रीलंका यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर अंवलबून असेल.
चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ आतातरी बॅकफूटवर दिसत आहे. दुसरीकडे श्रीलंकेने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडवर मजबूत पकड घेतली आहे. वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असे वातावरण व खेळपट्टी असतानाही पाहुण्या श्रीलंकन क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. कुशल मेंडिसच्या आक्रमक 87 धावा आणि कर्णधार दिमुथ करुणारत्नेची 50 धावांची संयमी खेळी याच जोरावर श्रीलंकेने पहिल्या डावात 355 धावा केल्या. दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडचे पाच फलंदाज 162 धावांवर माघारी परतले आहेत.
न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावाची सुरुवात चांगली केली. टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र त्यानंतर असिथा फर्नांडो आणि लाहिरू कुमार यांनी किवींना बॅकफूटवर फेकले. दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंड 5 बाद 162 धावा आहे आणि 193 धावांनी पिछाडीवर आहे.
भारतासाठी फायनलचे समीकरण काय आहे ?
अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली किंवा ऑस्ट्रेलिया जिंकला तरीही टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकते. पण भारताला यासाठी प्रार्थना करावी लागेल. न्यूझीलंड संघ श्रीलंकेविरुद्धचा एक तरी सामना जिंकेल किंवा अनिर्णित राखेल. अशा स्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होईल.