232 पैकी 49 पदाधिकाऱ्यांचा खर्च क्रीडा महासंघांकडे !

वृत्तसंस्था
रविवार, 12 ऑगस्ट 2018

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अखेर जंबो पथकाला मंजुरी दिली. हा आकडा तब्बल 804 पर्यंत गेला आहे. यातील 755 जणांचा खर्च सरकार करेल. 232 पैकी 49 पदाधिकाऱ्यांचा खर्च मात्र संबंधित क्रीडा महासंघांना करावा लागेल. 

नवी दिल्ली- आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अखेर जंबो पथकाला मंजुरी दिली. हा आकडा तब्बल 804 पर्यंत गेला आहे. यातील 755 जणांचा खर्च सरकार करेल. 232 पैकी 49 पदाधिकाऱ्यांचा खर्च मात्र संबंधित क्रीडा महासंघांना करावा लागेल. 

भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) सादर केलेल्या खेळाडू- पदाधिकाऱ्यांच्या सर्व नावांना मंत्रालयाने मंजुरी दिली, त्यात 49 जणांचा खर्च सरकार करणार नाही, हीच एकमेव अट घालण्यात आली. याविषयीचे अधिकृत पत्र "आयओए'ला पाठविण्यात आले. 

ऍथलेटिक्‍स संघ मोठा 
सर्वाधिक 13 पदकांमुळे ऍथलेटिक्‍समध्ये सर्वाधिक 50 जणांचा सहभाग असेल. एकूण संघ 75 जणांचा असेल. दुसरा क्रमांक मात्र कनु-कयाक संघाचा आहे. त्यात 49 खेळाडूंसह 60 सदस्य आहेत. हॉकीत 36 खेळाडूंसह 51 सदस्य, नेमबाजीत 28 खेळाडूंसह 36 सदस्य आहेत. 

पॉइंटर्स जोड 
- ऍथलेटिक्‍स संघातील दोन व्यवस्थापक, पाच पदाधिकाऱ्यांचा खर्च सरकार करणार नाही 
- द्युती चंद, एन. रमेश सिंग यांच्या वैयक्तिक ट्रेनरसह चार जणांना "पी-कार्ड' दर्जा 
- कुराशचे सहा पदाधिकारी, हॅंडबॉलचे पाच पदाधिकारी स्वखर्चाने 

भत्ता किती? 
- 572 क्रीडापटू, 119 प्रशिक्षकांना दिवसाला प्रत्येकी 50 डॉलरचा खर्च 
- 21 डॉक्‍टर्स, 43 अतिरिक्त पदाधिकाऱ्यांना दरदिवशी प्रत्येकी 25 डॉलर 
- "आयओए' पथकातील 12 सदस्यही "लाभार्थी' 
- स्पर्धेपूर्वी स्थिरावण्याचे दिवस, स्पर्धेचा एकूण कालावधी, स्पर्धेनंतर एक दिवस भत्ता लागू 

Web Title: Officers Expense has been spend sports federation