खेळाडूने केला अनेक मुलींसोबत सेक्स; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

एका खेळाडूचा अनेक मुलींसोबत सेक्स पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली.

बुडापेस्ट : एका खेळाडूचा अनेक मुलींसोबत सेक्स पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली.

ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलेला हंगेरीचा खेळाडू जोल्सट बोरकाई एका सेक्स स्कँडलमध्ये अडकला आहे. जोल्सट बोरकाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तो अनेक मुलींसोबत ड्रग्स घेताना दिसत आहे. शिवाय, सेक्स करत असलेला व्हिडिओ अनेक पॉर्नसाइटवरही अपलोड झाला आहे. जोल्सटने 1988 मध्ये सेऊल ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याने पॉमेल हॉर्स स्पर्धेत ही कामगिरी केली होती.

जोल्सट बोरकाई फक्त ऑलिम्पिक पदक विजेताबरोबरच हंगेरीतील ग्योअर प्रांताचा महापौर आहे. नुकतीच त्याने निवडणूक जिंकली होती. मात्र, सेक्स स्कँडल उघडकीस आल्यानंतर हंगेरीतील सत्ताधारी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पण, महापौरपद सोडण्यास नकार दिला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंर दोन मुलांचा वडील असलेल्या जोल्सटने माफी मागताना म्हटले आहे की, 'माझ्या सेक्स स्कँडल व्हिडिओमध्ये छेडछाड झाली आहे. मी मुलींसोबत सेक्स केलं हे नाकारणार नाही.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Olympic gold medalist filmed in drug fuelled orgy sex tape with prostitutes