esakal | चक दे इंडिया! भारताने सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला लोळवलं
sakal

बोलून बातमी शोधा

चक दे इंडिया! भारताने सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला लोळवलं

चक दे इंडिया! भारताने सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला लोळवलं

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Tokyo Olympics 2020 India Argentina : ऑलिम्पिक स्पर्धेत भरातीय संघाने तिसरा विजय मिळत आगेकूच केली आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाचा पराभव केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाने धडक मारली आहे. मागील 41 वर्षांपासून हॉकीमध्ये भारतीय संघाला जेतेपदानं हुलकावणी दिली आहे. मात्र, यंदा पुरुष हॉकी संघाकडून पदकाची आशा पल्लवीत झाली आहे.

ए गटामध्ये भारतीय संघाने चौथ्या सामन्यात तिसरा विजय नोंदवला आहे. भारतीय संघाने अर्जेंटिनावर 3-1 अशा फरकाने मात करत विजयी घौडदोड कायम राखली आहे. पहिल्या सत्रात भारत आणि अर्जेंटिना संघाने तुल्यबळ खेळ केला होता. पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आलं होतं. मात्र, दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने अधिक आक्रमकपणे खेळ करत अर्जेंटिनाचा धुव्वा उडवला.

हेही वाचा: ठाकरे सरकारची बदनामी; एसटी कर्मचारी निलंबित

अर्जेंटीनासारख्या मजबूत संघाला धूळ चारत भारतानं पुढील फेरीत प्रवेश केला आहे. या दणदणीत विजयासोबतच भारतीय पुरुष हॉकी संघाने पदकाच्या आशा वाढवल्या आहेत. ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजयी अभियान कायम राखलं आहे. अर्जेंटीनाचा पराभव करत भारतीय संघानं ग्रुप ए मध्ये अव्वल दोन संगामध्ये स्थान पटकावले आहे. भारताचा ग्रुप स्टेजनुसार अखेरचा सामना जपानसोबत 30 जुलै रोजी होणर आहे.

loading image
go to top