ओंकार, हर्ष, अथर्वची हॅटट्रिक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

पिंपरी - ‘नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल’, ‘सेंट जोसेफ, पाषाण’ आणि ‘सेंट जोसेफ, खडकी’ यांनी ‘स्कूलिंपिक्‍स’च्या १६ वर्षांखालील मुला-मुलींच्या हॉकी स्पर्धेमध्ये रविवारी पहिल्या दिवशी विजयी सलामी दिली. ओंकार हांडे, हर्ष मुथय्या आणि अथर्व पवार यांची हॅटट्रिक पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. 

नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास हॉकी स्टेडियममध्ये मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात ‘नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल, फुलगाव’ संघाने ओंकार हांडे याच्या ‘हॅटट्रिक’च्या जोरावर ‘सेंट पॅट्रिक्‍स, हडपसर’वर ४-२ असा विजय मिळविला. ओंकारनेच चारही गोल केले. पराभूत संघाकडून अनुज जाधव आणि प्रज्वल मोरे (३० वे मिनीट) यांनी गोल केले. याच गटातील दुसऱ्या सामन्यात, ‘सेंट जोसेफ, खडकी’ संघाने ‘ज्योती इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपरी’चा ७-१ असा धुव्वा उडविला. विजयी संघाच्या प्रथम अंगीर याने रोनक येडेलू याच्या पासवर तिसऱ्या मिनिटाला पहिला गोल केला, त्यानंतर हर्ष मुथय्या आणि अथर्व पवार या दोघांनीही ‘हॅटट्रिक’ नोंदवत संघाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पराभूत संघाकडून अभिषेक जाधव याने रोहित पिसाळ याच्या पासवर २० व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदविला.

मुलींच्या गटात ‘सेंट जोसेफ, पाषाण’ संघाला ‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल, पुणे कॅम्प’ संघाविरुद्ध १-१ अशी बरोबरी स्वीकारावी लागली. विशेष म्हणजे सामन्यातील दोन्ही गोल पाठोपाठ झाले. अल्पना टोपो हिने सामन्याच्या २६व्या मिनिटाला सेंट जोसेफ संघाला आघाडी मिळवून दिली; पण पुढच्याच २७व्या मिनिटाला त्यांना गोल स्वीकारावा लागला. अँग्लो उर्दूसाठी हा गोल हुमेरा शेख हिने केला.

Web Title: Omkar, harsh, Atharva's hat-trick