PR Sreejesh : द स्ट्राँग वॉल ऑफ इंडिया!

PR Sreejesh : द स्ट्राँग वॉल ऑफ इंडिया!
Gurinder Osan

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना 41 वर्षांनी पदक पटकावलं. सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल करताना सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत भारताने जर्मनीला 5-4 ने पराभूत केलं. या सामन्यात सुरुवातीला जर्मनीने 3-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानतंर भारतीय खेळाडूनी कमाल करत जर्मनीला रोखत आक्रमक खेळ केला.

आघाडीवर असलेल्या जर्मनीला भारताने 5-3 असं पिछाडीवर टाकलं. अखेर सामना एका गोलच्या फरकाने जिंकला. भारताच्या एकूणच ऑलिम्पिकमधील कामगिरीत सर्वाधिक कौतुक आणि चर्चा कोणाची झाली असेल तर हॉकी संघाचा द वॉल असलेला पी आर श्रीजेश. जर्मनीच्या खेळाडूंना या सामन्यात अनेकदा गोल करण्याची संधी मिळाली. मात्र श्रीजेशसमोर ते निष्प्रभ ठरले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये श्रीजेशने अनेक गोल वाचवले. त्यानं क्वार्टर फायनलमध्ये ब्रिटनविरोधात बचाव केला होता. गोलपोस्टमध्ये तो भिंतीसारखा उभा राहिल्यानं त्याला द वॉल असंही म्हटलं जात आहे. जर्मनीचे आक्रमणही त्यानं चपळाईने थोपवलं. जर्मनीला नमवून विजय मिळवल्यानंतर श्रीजेशने जोरात जल्लोष केला. यावेळी आनंदाच्या भरात तो गोलपोस्टवर चढून बसला.

PR Sreejesh : द स्ट्राँग वॉल ऑफ इंडिया!
वेलडन बॉइज! पाहा रोमांचक सामन्यातील विजयी क्षणचित्रे

कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात शेवटच्या काही मिनिटात जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र त्याने पुन्हा एकदा जर्मनीचे प्रयत्न फोल ठरवले. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला. जर्मनीला सामन्यात एकूण 13 कॉर्नर मिळाले. त्यात फक्त एकच गोल यशस्वीपणे करता आला. इतर सर्व पेनल्टी कॉर्नर श्रीजेशनं अडवले.

आपल्या अनुभवाचा श्रीजेशनं जबरदस्त असा वापर केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पेनल्टी कॉर्नर रोखण्यात त्याला चांगलं यश मिळालं आहे. गेल्या 13 वर्षाच्या कारकिर्दीत श्रीजेशनं फक्त संघाला विजय मिळवून दिलेला नाही तर त्यानं स्वत:ला एक उत्कृष्ट गोलिकीपर म्हणून सिद्ध केलं आहे. 2014 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या आणि राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचा तो एक भाग होता.

PR Sreejesh : द स्ट्राँग वॉल ऑफ इंडिया!
VIDEO : जय हो! 5 मिनिटात 3 गोल; पाहा मॅचचा टर्निंग पॉइंट

भारतीय हॉकी संघाने 41 वर्षांनी ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे. या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पीआर श्रीजेशच्या वडिलांनी आपल्या मुलाचा अभिमान वाटतो असं म्हटलंय. तसंच भारताने कांस्य पदक जिंकलं असलं तरी मला वाईट वाटत नाही. मुलानं देशासाठी पदक जिंकल्याचा आनंद आहे अशा शद्बात श्रीजेशच्या वडिलांनी भावना व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com