'अरे चांगल्या दर्जाची पँट तरी द्या', फाटलेल्या पँटमुळे पाकची नाचक्की

PAK vs AUS 1st test
PAK vs AUS 1st test sakal

PAK vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आहे. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. बाबर आझम पाकिस्तान संघाचे नेतृत्व करत आहे, तर कांगारू संघाची धुरा पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे.

सामन्याच्या चौथ्या दिवशी एक रंजक घटना घडली. क्षेत्ररक्षणासाठी आलेला पर्यायी खेळाडू शान मसूदची पॅन्ट फाटली, त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. cricket.com.au ने स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 4 बाद 476 धावा करून पहिला डाव घोषित केला. अझहर अलीने 185 आणि इमाम-उल-हकने 157 धावांचे योगदान दिले. दोन्ही खेळाडूंनी दुसऱ्या विकेटसाठी 208 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनीही प्रत्युत्तर देत पाकिस्तानी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. प्रथम डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी 156 धावांची शानदार सलामी देत ​​संघाला चांगली सुरुवात करून दिली. ख्वाजाने 97 आणि वॉर्नरने 68 धावांचे योगदान दिले.

सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सहा सहा गडी बाद ४४९ धावा केल्या असून अजूनही पाकिस्तानपेक्षा २७ धावांनी पिछाडीवर आहे. मिचेल स्टार्क १२ आणि पॅट कमिन्स चार धावा करून खेळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com